सिलिंडर मॅन पाठोपाठ पेट्रोल मॅन प्रसिद्धीच्या झोतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST2021-09-27T04:43:29+5:302021-09-27T04:43:29+5:30

बदलापूर : बदलापूरमधील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणांचा फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘पेट्रोल मॅन’ ...

Cylinder Man followed by Petrol Man in the limelight | सिलिंडर मॅन पाठोपाठ पेट्रोल मॅन प्रसिद्धीच्या झोतात

सिलिंडर मॅन पाठोपाठ पेट्रोल मॅन प्रसिद्धीच्या झोतात

बदलापूर : बदलापूरमधील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणांचा फोटो सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘पेट्रोल मॅन’ नावाने टॅगलाइन टाकून अविनाश डामसे याला प्रसिद्धी देण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमुळे रातोरात हीरो झालेला हा तरुण दाक्षिणात्य केजीएफ चित्रपटातील सुपरस्टार यशसारखा दिसत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या बदलापूरचा ‘पेट्रोल मॅन’ अविनाश डामसे या ३२ वर्षीय तरुणाचा पेट्रोल पंपावर काम करतानाचा फोटो पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने काढला. सहज काढलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो अंबरनाथमधील खुंटवली गावात आपली आई, भाऊ आणि वहिनीसोबत राहतो. आठ वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अविनाशच्या खांद्यावर आली आणि त्याने पेट्रोल पंपावर कामाला सुरुवात केली. मागील १० वर्षांपासून अविनाश पेट्रोल पंपावर काम करत आहे. पेट्रोल मॅन अविनाशची शरीरयष्टी, त्याच्या दाढी आणि केसांच्या स्टाइलमुळे तो पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तो सुपरस्टार यश असल्याचा भास होतो. दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा चाहता असल्याने ही स्टाइल केल्याचे अविनाशने सांगितले. सिलिंडर मॅन सागर जाधवनंतर आता पेट्रोल मॅन अविनाशलाही सर्वस्तरातून प्रसिद्धी मिळत आहे.

------

Web Title: Cylinder Man followed by Petrol Man in the limelight