ठाणे : प्रेयसीच्या नव-याला संपवण्याचा कट रचणाºया प्रियकरासह तिघांना कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींकडून दोन जिवंत काडतुसांसह देशी कट्टा पोलिसांनी जप्त केला. यातील मुख्य आरोपी नीलेश चलवादे हा विवाहित असून, त्याला सहा महिन्यांचा मुलगा आहे. ठाण्यात राहणाºया नीलेशचे एका मुलीवर प्रेम होते. दीड वर्षापूर्वी वडोदºयातील एका मुलाबरोबर तिचेलग्न झाले. लग्नानंतरही नीलेश प्रेयसीच्या संपर्कात होता. नवºयाकडून होणाºया त्रासाविषयी ती नेहमी तक्रार करत असे. या छळातून लवकरच तुझी मुक्तता करीन, असा शब्द नीलेशने तिला दिला. यातूनच नीलेशने तिच्या नवºयाला संपवण्याचा कट रचला.नीलेशचा तंबाखूचा व्यवसाय असून, ब्रिजेशकुमार पांडे याची पानपट्टी आहे. दोघांचे व्यावसायिक संबंध होते. नीलेशने ब्रिजेशकुमारला विश्वासात घेतल्यानंतर तो हत्येच्या कटात सहभागी होण्यासाठी तयार झाला. यासाठी ब्रिजेशकुमारने आॅटोरिक्षाचालक अजयकुमार मौर्य याला सोबतीला घेतले. त्यांनी पिस्तुलाची व्यवस्था करण्यासाठी ४ लाखांची मागणी केली. नीलेशने ७० हजार दिल्यानंतर पिस्तुलाची व्यवस्था झाली. हा व्यवहार सुरू असतानाच कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलाश कोटले यांच्या खबºयाला कटाचा सुगावा लागला. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रेयसीच्या पतीला संपवण्याचा कट, ठाण्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:22 IST