शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक देतात खऱ्या नोटा, पण बनावट नोटांची माळ देऊन गंडवतात ऑर्केस्ट्रा बार चालक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 10:45 IST

ग्राहकांकडून असली नोटा घेऊन बारबालांच्या गळ्यात मात्र नकली नोटांचा हार बारवाले घालत असल्याचे उघडकीस आले आहे. 

धीरज परब

मीरारोड - ऑर्केस्ट्रा बारच्या आड मीरा भाईंदरमध्ये सर्रास बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील नाच व हावभाव करत आंबट शौकीन ग्राहकांना भुरळ घालत असतात. ग्राहक त्यांच्यावर कडक कोऱ्या नोटांची उधळण करत गळ्यात नोटांचा हार घालतात. परंतु काशीमीरा पोलिसांनी एका ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या धाडीत नोटांच्या हारातील नोटाच नकली असल्याचे आढळून आले आहे. ग्राहकांकडून असली नोटा घेऊन बारबालांच्या गळ्यात मात्र नकली नोटांचा हार बारवाले घालत असल्याचे उघडकीस आले आहे. 

मीरा भाईंदरमध्ये ऑर्केस्ट्रा बारची संख्या मोठी आहे. ऑर्केस्ट्रा बार असल्याने नृत्यास मनाई आहे. तर गाण्यासाठी गायक म्हणून ८ जणांना ठेवण्याची परवानगी असली तरी गायिका म्हणून ठेवल्या जाणाऱ्या बारबाला प्रत्यक्षात तोकड्या तंग कपड्यात अश्लील नाच व हावभाव करताना दिसून येतात. पोलिसांकडूनही अशा प्रकारचे अनेक गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत. 

काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पवार व पोलीस पथकाने मिळालेल्या माहिती नुसार २४ व २५ डिसेम्बर च्या मध्यरात्री दहिसर चेकनाका जवळ असलेल्या मंत्रा बारवर छापा टाकला. गायिका म्हणून असलेल्या ७ बारबालांनी तोकडे व पारदर्शक कपडे घालून अश्लील नाच व हावभाव चालवला होता. पोलिसांनी त्या ७ बारबालांसह १ वादक, ४ बार कर्मचारी, ५ ग्राहक व मालक कमला नारायण पुत्रण आणि चालक नितीन राज अशा २० लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्राहकांना पोलिसांनी अटक केली. सदर बारचे मूळ नाव नित्यानंद भवन असे आहे. 

बारमधील कारवाईत पोलिसांना नोटांचा हार मिळाला. आंबट शौकीन ग्राहक हे पसंतीच्या बारबालेच्या गळ्यात नोटांचा हार घालतात तसेच नोटा उडवत असतात. परंतु पोलिसांना मंत्रा बार मध्ये सापडलेला नोटांच्या हार मधील नोटा नकली असल्याचे आढळून आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस