शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

सी.आर.झेड. कायदा: १५ जानेवारीपर्यंत सूचना - हरकती नोंदवा - मुकुंद गोडबोले यांचे ठाण्यात आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 4:26 PM

सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्यातील प्रस्तवित बदल ठाण्यातील कोपरीकरांसाठी किती फायदेशीर याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्दे१५ जानेवारीपर्यंत आपल्या सूचना - हरकती नोंदवू शकतात - मुकुंद गोडबोले पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेंशनच्या माध्यमातून मार्गदर्शन नव्या सी.आर.झेड कायद्यांचे पूर्व ठाणेकर स्वागत करतील - पालकमंत्री

ठाणे: सागरी किनारा संरक्षण (सी.आर.झेड.) कायदा ९-२-१९९१ पासून अस्तित्वात आला. त्यानतंर तब्बल १० वर्षांनी म्हणजे २-११-२०११ पासून सुधारित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी शासनाने सुरु केली. ब्रिटिश सरकारचे जुने नकाशे व आता सॅट लाइटच्या मदतीने तयार झालेले नवे नकाशे नवा कायदा बनवताना शासन आधारभूत मानणार आहे. याबाबत नागरिक ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात लिखित स्वरूपात सोमवार, १५ जानेवारीपर्यंत आपल्या सूचना - हरकती नोंदवू शकतात असे प्रतिपादन ठाण्याचे वास्तुविशारद मुकुंद गोडबोले यांनी सांगितले.सी.आर.झेड २ अंतर्गत ठाणे पूर्वेचा परिसर किती बाधीत होऊ शकतो या जिव्हाळ््याच्या प्रश्नावर सी.आर.झेड. कायद्यातील प्रस्तावित बदल ठाण्यातील कोपरीकरांना किती फायदेशीर या विषयावर पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेंशनच्या माध्यमातून मुकुंद गोडबोले बोलत होते. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व या संस्थेने अष्टविनायक चौक, ग. मो.कोळी मार्ग, ठाणे पूर्व येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या भाषणास ठाणेकरांच्या उत्तम प्रतिसाद लाभला. नव्या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर अंदाजे ७० टक्के ठाणे पूर्व परिसर सी.आर.झेड. क्षेत्राच्या बाहेर येण्याची शक्यता त्यांनी शेवटी वर्तवली. या प्रगंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नव्या सी.आर.झेड कायद्यांचे पूर्व ठाणेकर स्वागत करतील. त्यातून पूर्वेला तुमच्या सहकार्याने आपण आदर्श नगरीची उभारणी करू या व आपले अनेक वर्षाचे स्वप्न साकार करू या. याप्रसंगी आ. रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख (कल्याण) गोपाळ लांडगे, नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर (गायकवाड), नगरसेविका नम्रता पमनानी आदी उपस्थित होते. शिवसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर माजी नगरसेवक गिरीश राजे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र