फडके पथ, बाजीप्रभू चौक येथे जमावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST2021-02-24T04:41:26+5:302021-02-24T04:41:26+5:30

डोंबिवली : कोरोनाची साथ अजूनही सुरू असून, दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने फडके रोड, नेहरू रोड, ...

Crowd at Phadke Path, Bajiprabhu Chowk | फडके पथ, बाजीप्रभू चौक येथे जमावबंदी

फडके पथ, बाजीप्रभू चौक येथे जमावबंदी

डोंबिवली : कोरोनाची साथ अजूनही सुरू असून, दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने फडके रोड, नेहरू रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक या ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये. ठाणे आयुक्तालय परिसरात सीआरपीसी कलमाप्रमाणे जमावबंदीचा आदेश जारी केला असून, या मनाई आदेशाचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मंगळवारी रामनगर पोलिसांनी केले.

लहान मुले व ज्येष्ठ नागरिक विनाकारण बाहेर पडल्यास आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्कचा वापर करून रोगाचा प्रादुर्भाव टाळावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

--------

फोटो आहे

जनजागृती करत असताना पोलीस.

Web Title: Crowd at Phadke Path, Bajiprabhu Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.