ज्योती कलानी यांच्या वाढदिवसाला गर्दी, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:00 AM2021-02-19T07:00:35+5:302021-02-19T07:01:18+5:30

Jyoti Kalani's birthday : स्वामी शांती प्रकाश पुतळा परिसरात जमलेल्या कलानी कुटुंबासह हजारो समर्थकांनी बुधवारी रात्री एकच जल्लोष केला.  

Crowd on Jyoti Kalani's birthday, show of strength by supporters | ज्योती कलानी यांच्या वाढदिवसाला गर्दी, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

ज्योती कलानी यांच्या वाढदिवसाला गर्दी, समर्थकांचे शक्तिप्रदर्शन

Next

उल्हासनगर : माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कलानी समर्थकांनी बुधवारी भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. कलानी कुटुंबाकडून २०२२ मधील महापालिका निवडणुकीचे एकप्रकारे बिगूलच वाजविले गेले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आग लागली. दरम्यान, कलानी कुटुंब व समर्थकांनी कोरोना काळात गर्दी केल्याने टीकेची झोड उठत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे औचित्य साधून कलानी कुटुंबाने व समर्थकांनी कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ज्योती कलानी, ओमी कलानी व पंचम कलानी यांच्या हस्ते  निवडणुकीचे बिगुल वाजविले. स्वामी शांती प्रकाश पुतळा परिसरात जमलेल्या कलानी कुटुंबासह हजारो समर्थकांनी बुधवारी रात्री एकच जल्लोष केला.  
महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कलानी कुटुंब सक्रिय झाले असून, गेल्या निवडणुकीत ओमी कलानी टीमने भाजपसोबत आघाडी करून समर्थकांना भाजपच्या चिन्हावर रिंगणात उतरविले होते. ओमी टीममुळे भाजप कधी नव्हे ते सत्तेत येऊन पक्षाला महापौर पद मिळाले. विधानसभेची उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपमधील ओमी टीम नगरसेवकांनी बंडखोरी करून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्याऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. 

Web Title: Crowd on Jyoti Kalani's birthday, show of strength by supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.