- सदानंद नाईकउल्हासनगर - कॅम्प नं-४, मराठा सेकशन येथील पक्षाच्या मध्यवर्ती शाखेत शिंदेसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांनी तुफान गर्दी केली असून उमेदवारी बाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत महायुती बाबत अटकले सुरू असताना दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थिती झाली. यावेळी २४७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली. मुलाखतीचा अहवाल पक्षप्रमुख व समितीकडे गेल्यावर उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. मुलाखती देण्यासाठी तरुणांची मोठी संख्या होती. दरम्यान भाजप व शिंदेसेनेत महायुतीबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती लांडगे यांनी देऊन, एकमेका पक्षात प्रवेश झालेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीपासून डावलण्यात येणार नाही. ओमी टीम, साई पक्ष व रिपाई गट यांना सोबत गृहीत धरूनच महायुती धर्मानुसार भाजप सोबत महायुतीबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सन-२०१७ मध्ये महापालिकेत निवडून आलेल्या पक्षनिहाय शिंदेसेना, ओमी टीम, साई पक्षातील माजी नगरसेवकांच्या उमेदवारीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यांच्यातून शिल्लक राहिलेल्या जागेसाठी, ज्या पक्षाचा उमेदवाराने क्रमांक-२ ची मते घेतली. त्यांचा उमेदवारीचा विचार होणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केले. लांगडे यांच्या वक्तव्याने इच्छुक उमेदवारा मध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. जुन्याच नगरसेवकांना उमेदवारी मिळत असतीलतर वर्षानुवर्षे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी झेंडे व सतरंज्या उचलायच्या काय? असा प्रश्नही विचारला जात आहे. एकूणच निवडणुकी दरम्यान उमेदवारीसाठी बंडाळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली.
Web Summary : Ulhasnagar Shinde Sena interviews draw crowds, hinting at an alliance with Omi Team, Sai, and RPI factions for upcoming elections. Senior leaders will decide.
Web Summary : उल्हासनगर शिंदे सेना साक्षात्कार में भारी भीड़ उमड़ी, आगामी चुनावों के लिए ओमी टीम, साई और आरपीआई गुटों के साथ गठबंधन के संकेत मिले। वरिष्ठ नेता फैसला करेंगे।