विक्रमगडमध्ये ‘आधार’साठी गर्दी

By Admin | Updated: February 19, 2016 02:19 IST2016-02-19T02:19:43+5:302016-02-19T02:19:43+5:30

शासनाच्या आधारकार्ड योजनेत योग्य नियोजनाचा अभाव दिसतो आहे. विक्रमगड तालुक्यांतील ९४ गावपाडयातील ४२ ग्रामपंचायतील जनतेसाठी विक्रमगगड पंचायत

The crowd for 'Aadhaar' in Vikramgad | विक्रमगडमध्ये ‘आधार’साठी गर्दी

विक्रमगडमध्ये ‘आधार’साठी गर्दी

राहुल वाडेकर ,  तलवाडा
शासनाच्या आधारकार्ड योजनेत योग्य नियोजनाचा अभाव दिसतो आहे. विक्रमगड तालुक्यांतील ९४ गावपाडयातील ४२ ग्रामपंचायतील जनतेसाठी विक्रमगगड पंचायत
समिती त्यानंतर ग्रामपंचायत हॉल व आता तहसील कार्यालय येथे आधाकार्ड केंद्र सुरु करण्यांत आले आहे़ सद्यस्थित आधारकार्ड नोंदणीसाठी रोजच गर्दी वाढत आहे़ आतपर्यत दीड ते दोन वर्षात अंदाजे सरासरी ३५ हजार लोकांनी आधारकार्डसाठी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आहे़
विक्रमगड येथील आधार
केंद्रात रोज १०० च्या सरासरीने नोंदणी केली जात असून हे केंद्र सुरळीत सुरु आहे व याचा लाभ जनता घेतांना दिसत आहे़ आधारकार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी त्याची संपूर्ण
ओळख सांगणारा दस्तऐवज ठरणार आहे. त्यानुसार त्याला बारा
आकडी क्रमांक (यु़ आय़ डी़)
मिळणार असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रानुसार हा कार्यक्रम राबविला जात आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून शासकीय सेवा सुविधांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचावा, भारतातील नागरिकाला भारतात कोठेही स्वतंत्रपणे आपले या नंबरच्या माध्यमातून अस्तित्व सिद्ध करता यावे स्थावर मालमत्ता, खरेदी-विक्री
आदी करतांनाही त्याचा उपयोग
व्हावा अशी ही योजना आहे. (वार्ताहर)

Web Title: The crowd for 'Aadhaar' in Vikramgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.