शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘पागडी रॅकेट’विरुद्ध फौजदारी गुन्हे, ठाणे महापालिकेची तक्रार; डायघर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:42 IST

या आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

गणेश देशमुख - मुंबई/ठाणे : एमएमआरडीएने बांधलेल्या आणि ठाणे महापालिकेच्या अखत्यारितील सदनिका लाखोंच्या पागडीवर परस्पर भाड्याने देणाऱ्या रॅकेटविरुद्ध डायघर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. ‘लोकमत’ने हे प्रकरण लोकदरबारात मांडले होते.ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे अधीक्षक तथा उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी १० जणांविरुद्ध शासनाची फसवणूक, विनापरवानगी घरात घुसणे, कटकारस्थान, मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा, फसवणूक, छळ आदी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी या सदनिका सील केल्या आहेत. पालिका कर्मचारी अनिल बागडे लिफ्ट व पाण्याच्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे रिक्त असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील सदनिकांमध्ये अनोळखी संशयास्पद व्यक्ती राहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा एकूण १९ सदनिकांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भाडेकरार करून अनधिकृत वापर करत असल्याचे आढळले. त्यामुळे तातडीने या १९ सदनिका स्थावर मालमत्ता विभागाच्या पथकाने सील केल्या आहेत.

फसवणूक करणारे दहा आरोपीया आरोपींमध्ये विजय रमेश चव्हाण, सुनील हरिप्रसाद रायबोले, खलील शेख, फरहत शेख, विजय हिरालाल जयस्वाल, फैमिना अहमद शेख, एम. एम. अन्सारी, मोहम्मद नादीर शकील अहमद, मुसाफिर हुसेन, शोएब मोहम्मद अन्सारी यांचा समावेश आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण? : मुंब्रा, शीळ येथे एमएमआरडीएने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच्या इमारतीतील अनेक सदनिका आरोपींनी भाड्याने दिल्या. त्यासाठी लाखोंची पागडी घेतली. एमएमआरडीएचे बनावट अलॉटमेंट लेटर दिले आणि ॲग्रिमेंट तयार केले. दाराची कुलपे बदलली. महेश आहेर यांनी त्यांच्या सहीचे बनावट अलॉटमेंट लेटर, भाडे करारनामे पुरावा म्हणून पोलिसांना सादर केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका