शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime news : धक्कादायक! ठाण्यात 4 मित्रांकडून बारबालेवर सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:45 IST

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देठाण्यातील एका बारमध्ये ही पीडित तरुणी वेटरचे काम करते. तिथेच तिची ओळख गोविंद राजभर (३२, रा. नालासोपारा, पालघर) याच्याशी झाली.

ठाणे - शहरातील कासारवडवली भागात एका २६ वर्षीय तरुणीवर चौघा मित्रांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाला आहे. यातील आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.

ठाण्यातील एका बारमध्ये ही पीडित तरुणी वेटरचे काम करते. तिथेच तिची ओळख गोविंद राजभर (३२, रा. नालासोपारा, पालघर) याच्याशी झाली. याच ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर त्याने लग्नाचे अमिष दाखवून घर खरेदीसाठी तिच्याकडून सात लाख ५५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेतले. नंतर तिच्याबरोबर शारिरिक संबंध ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ काढले. पुढे ते व्हायरल करण्याची भीती दाखवून घोडबंदर रोड येथील वेगवेगळया हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच अनैसर्गिक अत्याचार करुन तिला मारहाण आणि शिवीगाळही केली. इतक्यावरही न थांबता त्याने तिला धमकावून त्याच्याच तीन मित्रांच्या स्वाधीन केले. या तिघांनी काशीमीरा भागातील वसईकडे जाणाऱ्या ब्रिजच्या आधी फाऊंटन हॉटेलजवळ एका कारमध्ये पुन्हा तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार १ फेब्रुवारी २०१९ ते ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये घडल्याचे या पिडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला