शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३०० सीसीटीव्ही तपासून इराणी चोरांना ठाेकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:05 IST

Crime News: सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या सैयद मिसम अब्बास उर्फ हॅरी सैयद हुसेनी (२१, रा. इराणी वस्ती, आंबिवली, कल्याण) आणि मुस्तफा सलू इराणी (२२, आंबिवली, कल्याण) या दोन इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली.

ठाणे - सोनसाखळी खेचून पोबारा करणाऱ्या सैयद मिसम अब्बास उर्फ हॅरी सैयद हुसेनी (२१, रा. इराणी वस्ती, आंबिवली, कल्याण) आणि मुस्तफा सलू इराणी (२२, आंबिवली, कल्याण) या दोन इराणी अट्टल चोरट्यांना अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांनी बुधवारी दिली. त्यांच्याकडून १० गुन्हे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख ६०  हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अत्यंत चिवटपणे सुमारे ३०० सीसीटीव्हींच्या पडताळणीनंतर या चोरट्यांना पकडण्यात यश आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

वर्तकनगर भागात  १३ सापळा लावून केली अटक- दोन्ही घटनेतील चोरटे वेगवेगळ्या मोटारसायकलवरून कल्याण आंबिवलीच्या दिशेने पळून गेल्याची बाब समोर आल्यानंतर या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी आंबिवली येथील इराणी वस्तीत सापळा लावला. सैयद मिसम हुसेनी याने गॅलरीतून छताच्या पत्र्यावर उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास पाठलाग करून पकडण्यात आले.

मुंबई, ठाण्यातील १० गुन्ह्यांची कबुली- सैयदने सोनसाखळी जबरी चोरीचे सहा आणि एक मोटारसायकल चोरीचा अशा सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या  ताब्यातून मोटारसायकल आणि ३०  ग्रॅम सोन्याचे दागिने असा दोन  लाख ४०  हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याकडून वर्तकनगर आणि चितळसरचे प्रत्येकी दोन तर कापूरबावडी, विठ्ठलवाडी आणि खडकपाडा येथील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघड  झाले.  दुसरा चोरटा मुस्तफा सलू इराणी यालाही आंबिवलीतूनच  सापळा लावून अटक करण्यात आली. त्याने वर्तकनगर आणि कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या परिसरातील सोनसाखळी जबरी चोरीचे दोन तर मुलूंडमधील मोटारसायकल चोरीचा एक अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली.  त्याच्या ताब्यातून ३० ग्रॅम वजनाचे दागिने आणि एक मोटारसायकल असा दोन लाख २०  हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जानेवारी २०२४  रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या  घटना घडल्या घडल्या होत्या. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदाशिव निकम, संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी, इब्राहिम शेख, हवालदार वैभव जोशी आणि मधुसूदन पाटील या पथकामार्फत  सुरू होता. याच तपासात  पोलिसांनी घटनास्थळ आणि  चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल ३००  सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे