शस्त्र बाळगल्याने तिघांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: February 13, 2017 05:06 IST2017-02-13T05:06:39+5:302017-02-13T05:06:39+5:30
घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत तीन कारवाया करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

शस्त्र बाळगल्याने तिघांविरोधात गुन्हा
ठाणे : घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत तीन कारवाया करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने तलवार बाळगल्याप्रकरणी कोपरी भागातील कुणाल सुरेश जगताप याला अटक केली. दुसरी कारवाई वागळे इस्टेट भागात झाली. शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास किसननगरात मनोज पवार याच्याजवळ पोलिसांना धारदार सुरा आढळला. श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आणखी एका कारवाईत वागळे इस्टेट भागातील राजेश कुरेकर याच्याजवळून शनिवारी मध्यरात्री हनुमाननगरात सुरा जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)