वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 PM2020-12-31T16:33:32+5:302020-12-31T16:36:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मीटरशिवाय घरगुती वापरासाठी बेकायदेशीरपणे वीजेची चोरी करणाºया श्रीगुरु मलिक (४०, रा. वागळे इस्टेट, ठाणे ...

Crime against the power thief at Kopari police station | वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

अनधिकृतपणे घरगुती वापरासाठी घेतले कनेक्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे वीज वितरण कंपनीने केली कारवाई अनधिकृतपणे घरगुती वापरासाठी घेतले कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मीटरशिवाय घरगुती वापरासाठी बेकायदेशीरपणे वीजेची चोरी करणाºया श्रीगुरु मलिक (४०, रा. वागळे इस्टेट, ठाणे) यांच्याविरुद्द वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वीज चोरीच्या बिलाचा भरणा न केल्याने कंपनीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी गुरुवारी दिली.
ठाणे पश्चिमेतील हनुमाननगर येथील मलीक यांनी मीटर न लावताच अनधिकृतपणे वीज पुरवठा घेतल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे वागळे इस्टेट उपविभागाचे सहायक अभियंता किशोर आसरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी ५ डिसेंबर २०२० रोजी २ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर येथील वंदेमातरम चाळीत त्यांच्या घराजवळ तपासणी केली. तेंव्हा ३०० युनिटची वीज चोरी करुन तीन हजार ७२० रुपयांची वीज विनापरवाना घेतल्याचे आढळले. या वीज चोरीचे त्यांना दोन हजारांचे बिलही कंपनीने दिले. मात्र, या बिलाचा त्यांनी २८ डिसेंबरपर्यंत भरणाच केला नाही. अखेर याप्रकरणी सहायक अभियंता आसरे यांनी कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Crime against the power thief at Kopari police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.