विनयभंगप्रकरणी क्लीनरविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 27, 2017 23:57 IST2017-04-27T23:57:58+5:302017-04-27T23:57:58+5:30
एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी क्लीनर संतोष अहिर याच्याविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विनयभंगप्रकरणी क्लीनरविरुद्ध गुन्हा
डोंबिवली : एका १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी क्लीनर संतोष अहिर याच्याविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोेष हा एका शाळेच्या बसवर क्लीनर होता. तो त्या विद्यार्थिनीला त्रास देत होता. हा प्रकार तिने शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यामुळे शाळेने त्याला कामावरून काढले होते. संतोषने त्यानंतर तिला घराशेजारी गाठण्याचा प्रयत्न केला.
अनेकदा पाठलाग करून तिला त्रास दिला. उर्सेकरवाडी येथे ही मुलगी तिचे वडील व काकांसोबत जात असताना तिला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वडील व काकांनी संतोषला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानेच वडील व काकांना दमबाजी केली. यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. (प्रतिनिधी)