शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या उपायुक्तांकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पत्रकार बिनू वर्गीस विरुद्ध गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 5, 2021 19:37 IST

मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे कापूरबावडी पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांविरुद्ध तक्रारयाआधी ठाणेनगरमध्येही गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडूनच त्याने तीन लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप या तक्रारीमध्ये आहे.बिनू तसेच कथित महिला पत्रकार नाझीया सय्यद आणि उपायुक्तांविरुद्ध विनयभांची तक्रार करणारी अन्य एक महिला यांनी संगनमताने ठाण्यातील बाळकूम येथील ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात १५ मे २०२१ ते १ जून २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार केला. उपायुक्त केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ‘या रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा लैंगिक छळ केळकर यांच्याकडून सुरु असल्याचा मजकूर एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर टाकण्यात आला. तसेच त्याच रुग्णालयातील अन्य एका महिला कर्मचाºया सोबतचे फोटो व्हॉटसअ‍ॅपसह सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले. याव्यतिरिक्त अन्यही महिला कर्मचाऱ्यांचीही बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यातील तीन लाख रुपये हे १ जून २०२१ रोजी ठाण्यातील बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयात केळकर यांच्या कॅबिनमध्येच घेतल्याचा आरोप आहे. परंतू, यामध्ये पूर्ण पाच लाखांची रक्कम नसल्यामुळे त्यावेळी बिनूने त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. याच तीन लाखांमधील एक लाखांची रक्कम उपायुक्तांवर विनयभंगाची तक्रार दाखल करणाºया महिलेला दिले. तर उर्वरित एक लाख रुपये कथित महिला पत्रकार नाझिया हिला दिल्याचे बिनूने सांगितले. मुळात, विनयभंगाची तक्रारही बनावट असून उलट बदनामी करण्याची भीती दाखवून आपल्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याची तक्रार आता उपायुक्त केळकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कथित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता असलेल्या बिनूविरुद्ध खंडणीचा अवघ्या एकाच आठवडयात ठाणेनगर पाठोपाठ हा दुसरा गुन्हा आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी