शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Vasai: सलग तिसरा षटकार ठोकताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका; जागीच गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:37 IST

Vasai Cricketer Dies of Heart Attack: क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्याने खेळावरील प्रेमातूनच जीव गमावला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळ: पहिल्या दोन चेंडूंवर जबरदस्त सिक्स मारलेले... प्रेक्षकांकडून तिसऱ्या सिक्सरची मागणी होत होती... सलग तिसरा सिक्स मारण्यासाठी तो पुढे सरसावलाही... मात्र, नियतीला ते मंजूर नव्हते... क्रीझवरच तो कोसळला... पुन्हा कधीही न उठण्यासाठी. वसई तालुक्यातील कोपर या गावातील सागर वझे या अवघ्या २७ वर्षांच्या क्रिकेटपटूचा खेळाच्या मैदानातच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  चांगला खेळाडू अशी सागर वझेची पंचक्रोशीत ओळख. क्रिकेटवर निरातिशय प्रेम. पहिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. 

मैदानातच तरुणाचा मृत्यूशुक्रवारी सायंकाळी सामना रंगात आला होता. सागर क्रीझवर होता. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्ला चढवत दोन षटकार ठोकले. परंतु सागरला खेळावरील प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्याने खेळावरील प्रेमातूनच जीव गमावला.

त्याचा खेळ आता पाहता येणार नाही...सलग तिसरा षटकार मारण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. तो क्रीझबाहेर आला आणि आता तिसरा षटकार मारणार एवढ्यात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जागीच कोसळला. मैदानात उपस्थित सर्व खेळाडूंनी तत्परतेने सागरला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुण वयात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याची भावना परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी व्यक्त केल्या.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारHeart Attackहृदयविकाराचा झटकाMaharashtraमहाराष्ट्र