उल्हासनगरात क्रिकेट बेटिंग, तिघांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: May 8, 2024 19:48 IST2024-05-08T19:47:06+5:302024-05-08T19:48:27+5:30
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगरात क्रिकेट बेटिंग, तिघांवर गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३, अनिल-अशोक चित्रपटगृह परिसरात क्रिकेट बॅटिंग करिता लागणारी आयडी देण्यासाठी येणाऱ्या तिघा विरोधात क्रिकेट बेटिंगचा प्रकार ठाणे खंडणी विरोधी पथकाने उघड केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगरात क्रिकेट बेटिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापूर्वीही क्रिकेट बेटिंगचा गुन्हे शहरात दाखल झाले. आयपीएल क्रिकेट मॅच सुरू असून या सामन्यावर क्रिकेट बेटिंग जोरात सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथकाने कॅम्प नं-३ येथील अनिल-अशोक चित्रपटगृहा शेजारी धाड टाकून क्रिकेट बेटिंगसाठीं लागणारा आयडी देण्यासाठी आला असतांना विजय कुकरेजा, हनी सुरेश माखिजा व मोहित छाब्रिया या तिघांना अटक करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत असून मोठे घबाड उघडे होण्याचे बोलले जात आहे. क्रिकेट बुक्की व माजी नगरसेवक अनिल जयसिंगानी यांच्या मुलीने थेट उपमुख्यमंत्री यांच्या पत्नीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार यापूर्वी उघड झाला. मात्र या क्रिकेट बेटिंग मध्ये त्याचा काहीएक रोल नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.