शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

क्रेडिट, डेबिट कार्डांंवर आली हॅकर्सची संक्रांत! पोलिसांचा दावा : दररोज किमान एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या एटीएम कार्डाचे पिन क्रमांक मिळवून फसवणुकीचा सपाटा लावला आहे. सायबर गुन्हे शाखेकडील अशा तक्रारींचा ओघ नोटाबंदीनंतर वाढला आहे. दररोज किमान एक अशी याबाबतचे गुन्हे दाखल होण्याची सरासरी आहे.

सचिन सागरे कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या एटीएम कार्डाचे पिन क्रमांक मिळवून फसवणुकीचा सपाटा लावला आहे. सायबर गुन्हे शाखेकडील अशा तक्रारींचा ओघ नोटाबंदीनंतर वाढला आहे. दररोज किमान एक अशी याबाबतचे गुन्हे दाखल होण्याची सरासरी आहे.पेट्रोलपंप, मॉल, हॉटेल, दुकाने अशा ठिकाणी बिल भरण्यासाठी डेबिट अथवा क्रेडिट कार्ड दिले जाते. ग्राहक कार्डाद्वारे व्यवहार करताना पिन क्रमांक टाकतात. त्याचे क्लोनिंग करण्याची व्यवस्था हॅकर्सनी शोधून काढली आहे. कार्डचे क्लोनिंग केल्यावर तुमचा खाते क्र मांक, पिन क्र मांक आदी गुप्त माहिती चोरली जाते. मग ग्राहकांना बँकेकडून बोलतो आहे, असे सांगूत फोन केला जातो. तुमची माहिती अपडेट करायची असल्याचे सांगत बँक खाते क्र मांक, पिन क्र मांक आदी माहिती विचारली जाते. ही माहिती दिल्यावर काही मिनिटांतच आपल्या खात्यावरील पैसे काढून घेतले जातात.कल्याण पश्चिमेतील सिद्धेश्वर आळी परिसरात राहणारे निनाद झारे यांंच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन त्यांच्या बचत खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले. डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरात राहणाºया प्रल्हाद पाटील (६७) या ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएम कार्डचा डाटा हॅक करून परस्पर ५० हजार रुपये काढून घेण्यात आले. ठाकुरवाडी परिसरात राहणाºया शक्ती पिल्लाई यांच्या खात्यातून चाळीस हजार रु पये लंपास करण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील कासाबेला इमारतीमध्ये राहणाºया लक्ष्मीकांत बुगडे यांंच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन ३४ हजार ४८४ रुपयांची खरेदी करून त्यांची फसवणूक केली.बँक आवारात भित्तीपत्रक-बँक ग्राहकांकडून क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती फोनवर घेतली जात नाही.अनोळखी व्यक्तीने क्र ेडिट कार्ड नंबर, सीव्हीसी नंबर, कार्ड मुदत संपण्याची तारीख याबाबत विचारल्यास ती देऊ नका, अशी भित्तीपत्रके बँकांनी आवारात पोलिसांच्या सूचनेनंतर लावली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम