पतपेढीमालक, एजंटला अटक
By Admin | Updated: March 26, 2017 04:38 IST2017-03-26T04:38:19+5:302017-03-26T04:38:19+5:30
बोगस स्वाक्षरी करून सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पतपेढीच्या मालकासह एजंटला

पतपेढीमालक, एजंटला अटक
ठाणे : बोगस स्वाक्षरी करून सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पतपेढीच्या मालकासह एजंटला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
व्यावसायिक विजय विश्वकर्मा (३२, रा. कासारवडवली) यांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार कापूरबावडी पोलिसांत दिली होती. त्यानुसार, विश्वकर्मा यांनी १० जुलै २०१५ पासून आजपर्यंत यशस्वीनगर येथील समानी पतपेढीत गुंतवणूक केली. बोगस स्वाक्षरीद्वारे त्यातील सुमारे २ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी पतपेढीचे मालक रविराज समानी (५१) आणि एजंट सचिन घाडगे यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला.
त्यानुसार, त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत त्या दोघांना तत्काळ अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.के. गायकवाड करत आहेत. (प्रतिनिधी)