शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

छट पुजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे महापालिकेकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 3:03 PM

ज्या पध्दतीने मराठी सणांवरुन निर्बंध लादले जातात, ते इतरांच्या बाबतीत होत नाहीत. गणेशमुर्तींचे विसर्जन हे कृत्रीम तलावातच करा असे सांगितले जाते. मात्र छट पुजेसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या विद्यार्थी सेनेने महापालिकेला एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार यासाठी सुध्दा कृत्रीम तलाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ठळक मुद्देइतरांना वेगळा न्याय कशासाठीआता तलाव प्रदुषित होत नाहीत का?

ठाणे - छट पूजेच्या निमित्ताने तलावांमध्ये मोठया प्रमाणात निर्माल्य टाकले जाते. तलाव परिसरात अस्वच्छता पसरते हे सर्व रोखणे गरजेचे आहे. गणेशोत्सव काळात ज्या प्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली जाते त्या धर्तीवर छट पूजे करिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाच्या वतीने ठाणे महापालिकेकडे करण्यात आली आहे.दरवर्षी ठाण्यात गणेशोत्सव, दहीहंडी तसेच नवरात्रोत्सव आले की ठाणे महापालिकेकडून प्रदुषण, सुरक्षा पाण्याचा अपव्यय इतर कारणे देत मराठी सणांवर बंदी तसेच मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला जातो. दहीहंडीत पाणी वापरू नका, डीजे लावु नका, गणेशोत्सवात विसर्जन तलावात करू नका तलाव प्रदुषित होतात मग छटपुजा तलावात तसेच परिसरात कशी साजरी केली जाते. निर्माल्य इतरत्र कसेही टाकले जात असताना कोणीही (महापालिका अधिकारी) का बोलत नाही? त्यांच्यावर नियम कायदे का लागु होत नाहीत?                       गणेशोत्सव कृत्रिम तलावत साजरा करा म्हणणारे त्यांना का नाही कृत्रिम तलावात छटपुजा साजरी करा. तलावात प्रदुषण करू नका असे सांगत नाहीत, आता सगळे गप्प का, असा प्रश्न महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाच्या वतीने ठाणे महापालिकेला विचारण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी उपवन परीसरात छट पुजा झाल्यानंतर त्या परिसरात जी अस्वच्छता पसरते त्यामुळे प्रदूषण होते ते रोखण्यासाठी गणेशिवसर्जनासाठी जसे कृत्रीम तलाव बांधण्यात येतात त्याच धर्तीवर या छट पूजेसाठी ते बांधावे अशी मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहराध्यक्ष दीपक जाधव पुष्कराज विचारे यांनी यांनी वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून छट पूजेसाठी कृत्रीम तलावांची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे. एकीकडे मराठी सणांवर निर्बंध घालताना इतरांना मात्र त्यात सूट देण्यात येते यावरून आपल्याच घरात हाल सोसते मराठी हे वाक्य सध्या महापालिका खरे ठरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMNSमनसे