शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘बायोमायनिंग’साठी अहवाल बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 01:28 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील २० लाख घनमीटर कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग कचरा प्रकल्प राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरील २० लाख घनमीटर कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग कचरा प्रकल्प राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तातडीने तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहे.आधारवाडी डम्पिंग १५ मे पर्यंत बंद करण्याचे लक्ष्य आयुक्तांचे आहे. तत्पूर्वी उंबर्डे व बारावे कचरा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. आधारवाडी डम्पिंगवर सध्या २० लाख घनमीटर इतका कचरा असून, त्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यातून पुनर्प्रक्रियायोग्य असलेले प्लास्टिक बाहेर काढले जाईल. तसेच विघटनशील कचरा त्यातून वर्गीकृत केला जाईल. जो कचरा विघटनशील नाही, त्याचेही वर्गीकरण केले जाईल. २० लाख घनमीटर कचºयापैकी जवळपास १२ लाख घनमीटर कचºयापासून खतनिर्मिती केली जाऊ शकते. तर, आठ लाख घनमीटर कचºयाचे बायोमायनिंग करावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी पाणी लागणार असून, महापालिकेने त्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे.कल्याण-पडघा रोडला तलवली गावानजीक दोन खाणींची प्राथमिक पाहणी घनकचरा विभागाने केली आहे. या दोन्ही खाणींचे क्षेत्रफळ जवळपास १७ हेक्टर इतके आहे. बायोमायनिंगसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावयाचा आहे. या अहवालानुसार साधारणत: १०० कोटींपेक्षा जास्त खर्चाचा हा प्रकल्प असेल. त्यामुळे राज्य सरकारकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून निधी मागितला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश कार्यक्षेत्रात बायोमायनिंगचा प्रकल्प कुठेही राबवलेला नाही. केडीएमसीने प्रथम त्याचा विचार केला आहे. इंदूरमध्ये हा प्रकल्प आहे.>किमान चार वर्षे लागणारघनकचरा शास्त्रोक्त विल्हेवाट व व्यवस्थापन या अंतर्गत २०१६ मध्ये केंद्र सरकारने नियमावली बदलली. त्यानुसार, डम्पिंग कॅपिंग पद्धतीने बंद न करता बायोमायनिंग पद्धतीने बंद करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेचा बायोमायनिंगचा प्रस्ताव हा २०१६ च्या नियमावलीस अनुसरून आहे. २० लाख घनमीटर कचºयाचे वर्गीकरण करून बायोमायनिंग प्रकल्प पूर्णत्वास येण्यास किमान चार वर्षे लागू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.