‘पंचामृत मोदका’ची क्रेझ
By Admin | Updated: September 4, 2016 03:10 IST2016-09-04T03:10:38+5:302016-09-04T03:10:38+5:30
गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे. यंदा स्पेशल फ्लेवर्सचे मोदक बाजारात नव्याने पाहायला मिळत

‘पंचामृत मोदका’ची क्रेझ
ठाणे : गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे. यंदा स्पेशल फ्लेवर्सचे मोदक बाजारात नव्याने पाहायला मिळत असून त्यापैकी ‘पंचामृत मोदक’ खास आकर्षण ठरले आहे.
मोदक खरेदी करायला येणारे ग्राहक पंचामृत मोदकांनाच पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.नेहमीच्या मावा, मलई मोदकांपेक्षा आंबा मोदक जास्त हिट ठरले आहे.
अवघ्या एक दिवसावर बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. यानिमित्त केल्या जाणाऱ्या खरेदीची लगीनघाई सुरू आहे. मखर, पूजेचे साहित्य, हारफुले, सजावटीचे साहित्य अशा खरेदीबरोबर महत्त्वाची खरेदी असते, ती मोदकांची. बाजारपेठेत भक्तांच्या खरेदीला उत्साह आला आहे. गर्दीची झुंबड उडाली आहे. मिठाईच्या दुकानांत तर भक्तांची रीघ लागली आहे. एरव्ही, पाच मिनिटांत होणाऱ्या या खरेदीला अर्धा-पाऊणतास भक्तांना थांबावे लागत आहे. मावा मोदकामध्ये खस, थंडाई, लिची-कोकोनट, जायफळ, कंदी, आंबा मावा हे मोदक असून ५०० ते ६०० रुपये किलोंना मिळत आहेत. मलई मोदकांमध्ये आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी, अंजीर, रोझ हे मोदक असून ६४० ते ६८० रुपये किलो दराने मिळत आहेत. काजू मोदकामध्ये प्लेन काजू, केशर, ड्रायफ्रूट, अंजीर हे मोदक असून ते ८०० ते १००० रुपये किलो दराने मिळत आहेत. स्पेशल फ्लेवर्समध्ये चंदन, केवडा, केशर, गुलाब, खस या पाच फ्लेवर्सचा मिळून असलेला ‘पंचामृत मोदक’ यंदा नवीनच पाहायला मिळत आहे. काजू, गुलाब, गुलकंद यांचा एकत्र फ्लेवर्स असलेला मोदक, मलई कुल्फी मोदक, बटरस्कॉच, रिअल रोझ पत्ती मोदक हे नवीन प्रकार मोदकांमध्ये पाहायला मिळत आहेत. ६०० ते ७०० रुपये किलोने हे मोदक मिळत आहे. ज्यांना दरवर्षी मोदकांमधील नावीन्य शोधण्याची इच्छा असते, ते ग्राहक स्पेशल फ्लेवर्सकडे वळतात, असे केदार जोशी यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा यंदा (पान ३ वर)