उल्हासनगर शिरू चौकातील अवैध बांधकामावर तोडक कारवाई, पोलीस संरक्षणात पाडकाम
By सदानंद नाईक | Updated: April 25, 2025 19:41 IST2025-04-25T19:40:30+5:302025-04-25T19:41:21+5:30
स्थानिक राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हे अवैध बांधकाम होत असल्याची चर्चा

उल्हासनगर शिरू चौकातील अवैध बांधकामावर तोडक कारवाई, पोलीस संरक्षणात पाडकाम
सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-२, शिरू चौकातील आरसीसीचे बहुमजली अवैध बांधकामावर नोडल अधिकारी गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त अलका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई करण्यात आली. शिरू चौकातील सोनार गल्लीतील अवैध बांधकामवार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौकात उभ्या राहिलेल्या बांधकामबाबत तक्रारीकरूनही महापालिकेने कारवाई केली नाही. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी नोडल अधिकारी गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त अलका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संरक्षणात बांधकामावर पाडकाम कारवाई केली. बांधकाम पूर्णतः जमीनदोस्त केल्यावर संबंधितावर न्यायालयाच्या आदेशनुसार गुन्हा दाखल करण्याचे संकेत अलका पवार यांनी दिले. शिरू चौक परिसर व सोनार गल्लीतील महापालिका सार्वजनिक शौचालय गेली कुठे? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.
सार्वजनिक शौचालयावर उभे राहिलेले अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई व संबंधितावर गुन्हे करण्याची मागणी या निमित्ताने होत आहे. स्थानिक राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हे अवैध बांधकाम होत असल्याचे बोलले जात आहे.