शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाविरोधात आता न्यायालयीन लढा; प्रदूषण मंडळ, एमआयडीसीला बजावणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 06:25 IST

हवा शुद्धतेसाठी ५०० यंत्रांचा प्रस्ताव

डोंबिवली : प्रदूषणामुळेडोंबिवलीतील नागरिक त्रस्त झाले असून त्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. शिवाय, काही भागांत नाल्यांमध्ये कारखान्यांतील दूषित पाणी प्रक्रि या न करताच सोडले जात असल्याने प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोणतीही उपाययोजना होत नसल्याने यासंदर्भात शहरातील दक्ष नागरिकांनी प्रदूषण मंडळ, एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.दक्ष समितीने शनिवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या नोटिशीचा मसुदा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

ज्यांना वैयक्तिक नोटीस पाठवायची असेल तर ते मसुद्याचा वापर करू शकतील, असेही ठरवण्यात आले आहे. सध्या पाच नागरिकांनी एकत्र येऊन आठवडाभरात नोटीस पाठविण्याचे ठरवले आहे. या नोटिशीला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास पुढील न्यायालयीन प्रक्रि या सुरू करण्यासंदर्भातही निर्णय झाला आहे. त्याचबरोबर येत्या काही महिन्यांत शहरात ५०० एअर प्युरिफायर लावण्यासाठी अमोल चाफेकर या अभियंत्याने पुढाकार घेतला असून, याबाबत महापालिकेला त्या यंत्रांची सर्व माहिती सादर केली आहे.

प्रजासत्ताकदिनी नो-हॉर्न डे पाळावा, असा उपक्र म पै फ्रेण्ड्स लायब्ररीतर्फे राबवण्यात येणार आहे. २६ जानेवारीला मध्यरात्री १२ ते रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत वाहनचालकांनी हॉर्न न वाजवता गाडी चालवावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. या संकल्पनेबाबत पै यांनी माहिती सांगत सर्व नागरिकांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. याबाबतची बैठक बुधवारी रात्री ९.३० वाजता टिळकनगर शाळेसमोरील लायब्ररीच्या जागेत होणार आहे.

स्वच्छता अभियानात वाढता लोकसहभागस्वच्छ डोंबिवली अभियानांतर्गत गेल्या दिवसांमध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील सर्वोदयनगरातील अनेक सोसायट्यांनी एकत्र येऊन याबाबत काम सुरू केले आहे.स्वच्छ डोंबिवली अभियानासंदर्भात महापालिकेच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली असून, पूर्वेला पाच आणि पश्चिमेला पाच प्लास्टिक वेस्ट बँक असाव्यात, अशी रचना करण्याचे ठरविले आहे. स्वच्छतेसंदर्भात सोसायट्यांमध्ये जागृती करण्यासाठी प्रशिक्षित स्वच्छतादूत येतील. सभासदांना माहिती देतील, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :pollutionप्रदूषणdombivaliडोंबिवलीCourtन्यायालय