टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील दाम्पत्य जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST2021-04-09T04:41:54+5:302021-04-09T04:41:54+5:30

ठाणे : टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील विजय शिंपी (५२, रा. बेतुलकरपाडा, कल्याण) आणि त्यांची पत्नी असे दोघे जण गंभीर जखमी ...

Couple injured on motorcycle in tanker collision | टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील दाम्पत्य जखमी

टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील दाम्पत्य जखमी

ठाणे : टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील विजय शिंपी (५२, रा. बेतुलकरपाडा, कल्याण) आणि त्यांची पत्नी असे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी टँकरचालक गोरखनाथ चव्हाण (५८, रा. उल्हासनगर) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.

विजय हे त्यांच्या पत्नीसह आपल्या मोटारसायकलवरून मुंबई-नाशिक हायवेवरील साकेत ब्रिजच्या मार्गाने कल्याण येथे ७ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास जात होते. ते माजीवडा सर्कल येथे आले असता, त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांच्या पत्नीच्या उजव्या हाताला आणि खांद्याला जोरदार टँकरचा मार लागल्यामुळे त्या खाली कोसळल्या. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच विजय यांच्या डोक्याला, खांद्याला आणि हातापायाला मुका मार लागून गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर टँकरचालकाला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Couple injured on motorcycle in tanker collision