शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

कर्करोग निदानाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - डॉ. अनिल हेरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 04:04 IST

दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही.

- मुरलीधर भवारकल्याण - दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. धकाधकीच्या या आयुष्यात अनेक गंभीर आजारांना आपण जवळ करत आहोत. काही वर्षांपूर्वी क्वचित आढळणाऱ्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. देशात आजघडीला जवळपास १२ लाख कर्करुग्ण आहेत. कर्करोग निदानपद्धती प्रगत झाली असली, तरी ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे हा खर्च आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत कर्करोगसर्जन डॉ. अनिल हेरूर यांनी व्यक्त केले.जागतिक कर्करोग दिन सोमवारी असून त्या पार्श्वभूमीवर डॉ. हेरूर यांनी सांगितले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी केवळ टाटा कर्करोग रुग्णालय आहे. कर्करोगावर तीन प्रकारे उपचार होतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी हे उपचार आहेत. टाटा कर्करोग रुग्णालयात रेडिएशनसाठी केवळ चार मशीन आहेत. या रुग्णालयात वर्षाला ३२ ते ४० हजार कर्करुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. तसेच कर्करोगग्रस्तांना रेडिएशन घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यांचा नंबर यावा लागतो. मुंबई उपनगरांचा विचार केला, तर मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रेडिएशन उपचारासाठी एकही यंत्र नाही. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात एक तरी रेडिएशन मशीन सरकारच्या आरोग्य विभागाने पुरवली पाहिजे. त्यामुळे कर्करुग्णांना टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागणार नाही, असे डॉ. हेरूर म्हणाले.सरकारला ते शक्य नसल्यास आरोग्य क्षेत्रातील सेवाभावी सामाजिक संस्थांच्या मदतीने अशी मशीन खरेदी करावी. अन्यथा, सीएसआर फंडातून कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करून कर्करुग्णांना दिलासा द्यावा, अशी सूचनाही डॉ. हेरूर यांनी केली आहे.हेरूर म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो. शहरी व ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येतात. महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण, तर पुरुषांमध्ये तोंड आणि फुफफुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण भारताचा विचार केल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. वर्षाला दोन लाख ५० हजार कर्करुग्ण आढळून येत असून १५ टक्क्यांनी वाढले आहेत. कर्करोगाचे निदान वेळीच झाले, तर ९० टक्के कर्करुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते, असे डॉ. हेरूर यांनी सांगितले.व्यसन न केल्यास कर्करोग टाळणे शक्य !मद्य, तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने तोंड आणि आतड्याचा कर्करोग होतो. व्यसने टाळल्यास कर्करोग टाळता येऊ शकतो. अतिलठ्ठपणामुळे महिलांना स्तनांचा, तर पुरुषांना आतड्याचा कर्करोग होतो.अन्नभेसळीमुळे पित्ताशय, आतड्याचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग रोखण्यासाठी जनजागृती केली पाहिजे.त्याची लक्षणे समजावून सांगितली पाहिजेत. त्याचा योग्य प्रचार-प्रसार झाल्यास कर्करोगावर मात करणे शक्य आहे, असे मत डॉ. हेरूर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :cancerकर्करोगPuneपुणे