शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चायनामेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत झाला भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:07 AM

चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी आणि नगरसेवक निधीतून शहराच्या विविध भागात हायटेक महागडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा दावा केला आहे.

ठाणे : ठाण्यातील महिलांची सुरक्षा तसेच चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी आणि नगरसेवक निधीतून शहराच्या विविध भागात हायटेक महागडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा दावा केला आहे. परंतु, ते चायना मेड असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या कॅमेºयात जवळचेही फुटेज व्यवस्थित दिसत नसल्याचे पत्र ठाणे पोलिसांनी देवूनही महापालिका ही बाब मान्य करण्यास तयार नसल्याचे सोमवारच्या स्पष्ट झाले. त्यातही शहरातील बहुतेक ठिकाणचे कॅमेरे बंद असून त्यांची दुरुस्तीही होत नसल्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उघड करून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत तसेच नगरसेवक निधीमधून १६०० कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये नगरसेवक निधीमधून १२०० तर स्मार्ट सिटी म्हणजेच ज्या संबधित कंपनीच्या शहरात मोफत वायफाय सेवा देण्याची योजना राबवण्यात येत आहे, तिच्या माध्यमातून ४०० कॅमेरे बसवण्याचे नियोजित केले आहे. यापैकी मोफत वायफायअंतर्गत एकूण १०० तर नगरसेवक निधीमधून १२०८ कॅमेरे बसवले आहेत. मात्र, यातील अनेक कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला.तशाप्रकारचे पत्रदेखील पोलिसांनी दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. बंद असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये एमटीएनएल चरई, ब्राम्हण सोसायटी, दगडी शाळा, गोखले रोड , मूस रोड तसेच प्रभाग १९,२०,२१ मधील कॅमेरे बंद असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.>पोलिसांचे काम महापालिकेने का केले?प्रत्येकी पाच लाख रु पये नगरसेवकनिधी घेऊन कॅमेरे बसवून ते कॅमेरे बंदच असतील तर त्यांचा उपयोग काय असा प्रश्न भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी उपस्थित केला. हे सर्व कॅमेरे चायना कंपनीचे असल्याचा संशयदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. शहराची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे सीसीटीव्ही बसवण्याचे काम पोलिसांचे होते. त्यामुळे त्यांनीच ती जबाबदारी व्यविस्थत पार पाडली असती. ठाणे महापालिकेने हे काम आपल्या डोक्यावर घेणे उचित नव्हते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यामुळेच महापालिकेलाच दोषारोपाला सामोरे जावे लागत असल्याचा टोलाही लगावला. तर शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर यांनीही आपल्या प्रभागात केवळ पाच कॅमेरेच बसवल्याची माहिती दिली.>१५ दिवसांत अहवाल : प्रशासनावर अशाप्रकारचे गंभीर आरोप झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रक्रि येवर आॅनलाईन पद्धतीने मॉनेटरिंग केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्हीचे सर्व रेकॉर्डिंग हे हाजुरी येथील डेटा सेंटरमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या उत्तरावर नगरसेवक समाधानी न झाल्याने अखेर त्यांनी येत्या १५ दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून पुढची कारवाई निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शहरात आतापर्यंत १२०८ कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांचा दर्जा उच्च प्रतीचा असल्याचा दावा विद्युत विभागाने केला आहे. ते बसवताना एनएबीएलची मान्यता घेतल्यानंतर तसेच या कॅमेºयांची चाचणी केल्यानंतरच ते बसवल्याचेही या विभागाचे म्हणणे आहे . प्रत्येक प्रभागात साधारणत: ७ ते ९ कॅमेरे बसवण्यात आले असल्याचेही या विभागाने स्पष्ट केले.