शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

बिलासाठी रोखला कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह; दागिने ठेवले गहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 02:18 IST

आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णालयाने मृतदेह दिला.

मीरा रोड : भार्इंदरच्या एका खासगी रुग्णालयाने बिलाचे पैसे दिले नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह तब्बल नऊ तास अडवून ठेवला. महिलेच्या मुलीने आईचे दागिने गहाण ठेवून व उसने पैसे घेऊन रुग्णालय आणि औषधांचे पावणेपाच लाख रुपये भरले. पण, रुग्णालयाने आणखी दोन लाख २६ हजारांचे बिल भरा सांगत मृतदेह अडवून ठेवला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्तक्षेपानंतर रुग्णालयाने मृतदेह दिला.उत्तनच्या भुतोडी बंदर येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेस भार्इंदर पूर्वेच्या फॅमिली केअर रुग्णालयात श्वसनाचा त्रास होत असल्याने मुलगी व मुलाने २६ जून रोजी उपचारासाठी दाखल केले होते. सामान्य कुटुंबातील रुग्ण महिलेची मुलगी १० ते १२ हजार पगाराची नोकरी करते. रुग्णालयाने पैसे मागितले तसे स्वत:जवळचे होते तेवढे भरले. नंतर, आईचे दागिने गहाण ठेवून पैसे आणून रुग्णालयात भरले. नातलग व नातेवाइकांकडून मिळतील तेवढे उसने व मदत म्हणून पैसे जमवले, तेही रुग्णालय व औषधासाठी खर्च झाले. रुग्णालयास दोन लाख ६० हजार, तर तेथील मेडिकल व औषधांसाठी सव्वादोन ते अडीच लाख खर्च झाले, असे मुलीने सांगितले. पैसे भरले नाहीत, तर मेडिकलमधून औषधे दिली जात नसत. शनिवारीही उपचार होत नसल्याने स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी गेल्या होत्या. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास रुग्णालयाने तुमचा रुग्ण गंभीर असल्याचे कळवल्याने मुलगी, मुलगा व अन्य नातलग रुग्णालयात दाखल झाले.सकाळी ८ च्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह हवा असेल, तर आधी दोन लाख २६ हजार भरा, असे सांगितले. इतके बिल झाले कसे आणि आधीच कर्जबाजारी झाल्याने आम्ही पैसे कुठून भरायचे, असा सवाल कुटुंबीयांनी केला. परंतु, पैसे भरा नाहीतर मृतदेह मिळणार नाही, असे रुग्णालयाने सांगितले.हॉस्पिटलला खडसावलेमुलगी आणि मुलगा आपल्या आईचा मृतदेह मिळावा, यासाठी रुग्णालयाच्या आवारात बसून असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी व्यवस्थापनाच्या शालिनी अय्यर यांना फोन केला आणि चांगलेच खडसावले. मग, रुग्णालयाने मृतदेह देण्यासाठी आधी दीड लाख व नंतर ५० हजार तरी भरा, असे नातलगांना सांगितले. पण, आपल्याकडे केवळ १० हजारच शिल्लक असल्याचे नातलगांनी स्पष्ट केले. नवघर पोलिसांकडे सरनाईकांनी तक्रार केल्यावर पोलीस रुग्णालयात दाखल झाले. सुरुवातीला आमचे व्यवस्थापक येतील, असा वेळकाढूपणा रुग्णालयाने केला. परंतु, तक्रार करून कारवाई करायला लावू नका, असे सरनाईकांनी खडसावल्यावर दुपारी ४ च्या सुमारास मृतदेह देण्यास रुग्णालय तयार झाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस