नगरसेवक आशिष दामलेला अखेर अटक

By Admin | Updated: June 9, 2015 18:55 IST2015-06-09T18:41:45+5:302015-06-09T18:55:40+5:30

गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूरातील आश्रमात तोडफोड करुन गुंडगिरी करणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामलेला अटक करण्यात आली.

Corporator Ashish is finally arrested | नगरसेवक आशिष दामलेला अखेर अटक

नगरसेवक आशिष दामलेला अखेर अटक

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ०९ - गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूरातील आश्रमात तोडफोड करुन गुंडगिरी करणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामलेला अटक करण्यात आली. गुंडगिरीप्रकरणी आशिष दामलेवर गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार विशेष पथकं पाठविण्यात आली होती. अखेर आशिष दामलेला मध्यप्रदेशातील औरसमधून ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या एका सहका-यांलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांच्याकडून १२ बोअर बंदूक आणि पाच राऊंड जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने कारवाई करत आशिष दामलेची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Web Title: Corporator Ashish is finally arrested