शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हातावर पोट असणाऱ्यांची जगण्यासाठीची धडपड सुरुच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:50 IST

कोरोनाचा संसर्ग ठाण्यात एकीकडे वाढत जात आहे, शहरात आजच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

- अजित मांडके - विशाल हळदे     ठाणे  : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 21 दिवसांचे लॉक डाऊन घोषीत करण्यात आले. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. मात्र जगायचं असेल तर त्यासाठी या लॉकडाऊनच्या काळातही हातावरचे पोट असणा:यांची धावपळ सुरुच असल्याचे चित्र शहरात अनेक भागात दिसत आहे. कोणी रेल्वे ट्रॅकवरुन घरातील रेशन आणण्यासाठी धावतोय तर कोणी घरातील चुल पेटली तर खाणो मिळेल या आशेने गॅसच्या रांगेत तासंन तास उभा राहतोयं.कोरोनाचा संसर्ग ठाण्यात एकीकडे वाढत जात आहे, शहरात आजच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बंद असल्याने अत्यावश्यक सेवांवरही ताण येत आहे, किराणा दुकानातील सामानही संपत आले आहे, काही दुकानातून महाग सामना विकले जात आहे. जे प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असे नाही. त्यामुळे लॉकडाऊन असतांनाही हातावरचे पोट असणा:यांची जगण्यासाठीची धावपळ ठाण्याच्या विविध भागात सुरु असल्याचे दिसत आहे. रोज कमवायचे रोज खायाचे अशी अनेक कुटुंबे ठाण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे महिना भराचा किराणा तरी कसा भरायचा असा पेच त्यांच्यापुढे आहे. आता तर घरातील किराणाही मिळने दुरापस्थ होऊन बसलयं, त्यामुळे जगण्याची धडपड त्यांची सुरु आहे. कोणी यासाठीच घरापासून तीन ते चार किमी पायी चालून घरातील किराणा आण्यासाठी उन्हा तान्हाची तमा न बाळगता, पायी चटके सहन करुन रेल्वे ट्रॅक तर कोणी रस्त्यावरुन पायपीट करतांना दिसत आहे. अशीच परिस्थिती ठाण्यातील अनेक भागात दिसत आहे.मुंब्रा रेतीबंदर मधील काही महिला अशाच पध्दतीने भर उन्हात घरातील मुलांसाठी दोन घास मिळावेत यासाठी कळवा नाक्यार्पयत रेल्वे ट्रॅकवरुन डोक्यावरुन किराणा माल घेऊन जात होते. ना जीवाची पर्वा ना कोरोनाची भिती, अशाच मानसिकतेत त्या दिसत होत्या. आमच्या घरच्यांची पोटं भरणो हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे या महिला सांगत होत्या. तर मुलुंड ते दिवा असा रेल्वे ट्रॅकने एका वृध्दाचा असाच प्रवास येथे दिसत होते. डोक्यावर किराणा सामान घेऊन हा वृध्द देखील जगण्यासाठीची दडपड कशी असते, हे दाखवून देत होता. दुसरीकडे, घरात चुल पेटली तरच घरच्यांना खायला मिळणार आहे. याच आशेवर गॅस एजेन्सीने देखील घर्पयत गॅसचा बाटला पुरवठा करणो बंद केल्याने, डोक्यावर तोच बाटला घेऊन जाऊन एक ते तीन कीमीचा पायी प्रवास करुन अनेक जण, तासन तास गॅसच्या रांगेत उभ राहत आहेत. कोणाकडे रेशन नाही, तर कोणाकडे गॅस नाही, अशीच काहीशी परिस्थिती सध्या अनेक भागात दिसत आहे. कोरोनाची भिती ही प्रत्येकाच्या मनात आहे, परंतु या सर्वाचीच जगण्यासाठीची धडपड ही सुरुच आहे.