शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: संपूर्ण कळवाच लॉकडाऊन; विटाव्यात सापडला कोरोनाचा १०वा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 21:55 IST

कळव्यातील काही चाळी आणि इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. 

ठाणे : कळव्यात कोरोनाचा १० वा रुग्ण सापडल्याने प्रशासनाची अक्षरशः झोप उडाली असून, यानंतर संपूर्ण कळवाचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. कळव्यात केवळ मेडिकल सुरू राहणार असून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली असल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी महापालिकेच्या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर कळव्यातील काही चाळी आणि इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचे केंद्रबिंदू आता कळवाच ठरले असून, कळव्यातील विटावा परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कळव्यात असून, ही संख्या आता १० वर जाऊन पोहोचली आहे. तर ठाणे शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही २२ वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीला पारसिक नगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर हे प्रमाण इतके वाढेल याची कल्पना देखील प्रशासनाला नव्हती.मात्र हा आकडा झपाट्याने वाढत असून आता संपूर्ण कळवाच लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कळव्यात ज्या-ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या इमारती आणि परिसर देखील सील करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये मनीषा नगर, कळव्यातील एक खासगी हॉस्पिटल, मनीषा नगर मधील एक चाळ आणि इतर काही परिसर सील करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

कळवा, मुंब्रा आणि दिव्यात आधीच सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर कळवा आणि मुंब्रा परिसरात भाजी मार्केट देखील पूर्णपणे बंद करण्यात आले असून, पुढील आदेश मिळेपर्यंत हे भाजी मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या कळव्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस