शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :‘शुभमंगल सावधान’देखील कोरोनामुळे लांबले, सभागृहमालकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:44 IST

अनेकांनी ‘कोरोना सावधान’ या सरकारच्या इशाऱ्याने केलेले बुकिंग रद्द केले अथवा पुढे ढकलल्याने लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांच्या उत्साहावर बोळा फिरला आहे.

- प्रज्ञा म्हात्रे/जान्हवी मोर्ये ठाणे/डोंबिवली : ‘शुभमंगल सावधान’ हा इशारा खरे तर नव्या उमेदीने नवे आयुष्य सुरू करण्याचा. मात्र, लग्नवेदीवर पाऊल ठेवण्यासाठी मुहूर्त काढलेल्या आणि हॉल, कॅटरर्सचे बुकिंग केलेल्या अनेकांनी ‘कोरोना सावधान’ या सरकारच्या इशाऱ्याने केलेले बुकिंग रद्द केले अथवा पुढे ढकलल्याने लग्न, मुंजी, बारसे, वाढदिवस अशा कार्यक्रमांच्या उत्साहावर बोळा फिरला आहे.हॉल व्यावसायिक रोहितभाई शहा म्हणाले की, आमच्या   हॉलमध्ये बुकिंग केलेले काही घरगुती समारंभ रद्द केले आहेत. आम्ही त्यांना तारखा पुढे ढकलण्यास सांगितले आहे. तर, अन्य एका हॉलचे महेश चाफेकर म्हणाले की, आमच्याकडील कोणताही सोहळा रद्द झालेला नाही. तसेही आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत आहोत.कल्याण-डोंबिवलीतील सभागृहांतील कार्यक्रम रद्द झाले आहेत. मार्च महिना असल्याने विवाहसोहळे आणि साखरपुड्याचे कार्यक्रम फारसे नव्हते. मात्र, सामाजिक संस्थांचे तसेच बारशाचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. कोरोनाचे संकट गहिरे झाले, तर मात्र एप्रिलमधील लग्नाच्या मुहूर्तांना मोठा फटका बसेल.डोंबिवलीतील सभागृह व्यवस्थापक शैलेश बने म्हणाले की, आमच्या सभागृहातील सामाजिक संस्थांचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. एप्रिलमध्ये काही लग्नाचे मुहूर्त असून कोरोनामुळे समारंभावर लागू केलेली बंदी मार्चअखेरनंतर वाढली, तर मोठा फटका बसेल, असे बने म्हणाले. सध्याचे रद्द केलेले कार्यक्रम पुढे ढकलले गेले, तर पुढचे बुकिंग घेता येणार नाही. त्यामुळे नुकसान तर होणार आहेच, असेही ते म्हणाले. कॅ टरिंगची आॅर्डर १५ दिवस आधी देत असल्याने ते नुकसान टाळता आले आहे.विजय देववाणी म्हणाले की, कोरोनामुळे हॉल, कॅटरर्स यांचे किती नुकसान होईल, याबाबत आताच काही माहिती देता येणार नाही. एप्रिलमध्ये १५ तारखेनंतर लग्नसोहळे आणि साखरपुड्यासाठी बुकिंग आहे.वाय.जी. भुस्कु णे म्हणाले की, लग्नसराईचे बुकिंग १५ एप्रिलनंतर आहे. दूरच्या गावांवरून येणारी पाहुणेमंडळी लग्नाला यायला तयार होणार नाहीत. त्यामुळे कॅटरिंग व्यवसायाला नक्कीच फटका बसेल. एखाद्या कार्यक्रमाचे बुकिंग केल्यावर तो रद्द केला, तर अनामत रक्कम परत केली जात नाही. पण, आताचे कारण सबळ असल्याने पैसे द्यावे लागतील.कॅटरिंग व्यवसायातील राजेंद्र कामतेकर म्हणाले की, आमच्या दोन कार्यक्रमांच्या आॅर्डर रद्द झाल्याने आम्हाला ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.लग्न, साखरपुडे या सोहळ्यांच्या आॅर्डर्स पुढे ढकलल्या आहेत, तर घरगुती समारंभाच्या आॅर्डर्स रद्द झाल्या आहेत.- सचिन जांभळे, कॅटरिंग व्यावसायिकलग्न समारंभाच्या सोडून सोसायटी, घरगुती कार्यक्रम, साखरपुडा समारंभांच्या सगळ्या आॅर्डर्स रद्द झालेल्या आहेत. काहींनी समारंभाच्या तारखा बदलल्या आहेत.- कैलाश होतचंदानी, कॅटरिंग व्यावसायिक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे