शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: साडेतीन हजार कैद्यांची होणार लवकरच सुटका, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 03:44 IST

केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या कारागृहांत सात वर्षे व त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या तब्बल साडेतीन हजार कैद्यांची सुटका केली जाणार आहे. त्यांना त्यांच्या गावी बसगाड्यांत बसवून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून अफवा आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. गरजू व रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.यावेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीबद्दल देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. लॉकडाउनच्या काळात सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. याबाबत कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या खबरदारीची माहिती दिली. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.मजुरांसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल कौतुकलॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना आणि बंदोबस्त करताना व्यस्त पोलिसांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही गृहमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोनाची स्थिती, प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेAnil Deshmukhअनिल देशमुख