Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील ८६६५ कोरोना रुग्ण व्हँटिलेटरवर; KDMC शहरात सर्वाधिक २ हजाराहून अधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:29 PM2021-04-26T17:29:22+5:302021-04-26T17:29:39+5:30

जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हँटिलेटरची सुविधा देऊन औषधोपचार केला जात आहे

Coronavirus Thane Updates: 8665 corona patients on ventilator; More than 2,000 patients in KDMC | Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील ८६६५ कोरोना रुग्ण व्हँटिलेटरवर; KDMC शहरात सर्वाधिक २ हजाराहून अधिक रुग्ण

Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यातील ८६६५ कोरोना रुग्ण व्हँटिलेटरवर; KDMC शहरात सर्वाधिक २ हजाराहून अधिक रुग्ण

Next

सुरेश लोखंडे 

ठाणे : कोरोना रुग्ण संख्येत सध्या काहीशी घट झालेली जिल्ह्यात दिसून येत आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ८६.८६ टक्के झाले आहे. तरी देखील कोरोनाच्या काही गंभीर रूग्णांपैकी तब्बल आठ हजार ६६५ रुग्ण ऑक्सिजनसह व्हँटिलेटर सपोर्टवर  उपचारास प्रतिसाद देत असल्याचे निदर्शनात आले आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याण डोंबिवलीतील दोन हजार २४७ रुग्णांचा समावेश आहे. 

 जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हँटिलेटरची सुविधा देऊन औषधोपचार केला जात आहे. यानुसार जिल्ह्याभरात आठ हजार ९२ रुग्ण आँक्शिजनवर आहे. तर व्हँटिलेटरवर ५७३ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील या महापालिका क्षेत्रात सहा हजार ९२८ रुग्ण ऑक्सिजनवर असून ५३६ रुग्ण व्हँटिलेटरवर उपचार घेत आहेत. यापैकी कल्याण डोंबिवली परिसरात दोन हजार १९९ रुग्ण ऑक्सिजनवर आहे व ४८ व्हँटिलेटरची सुविधा घेऊन उपचार घेत आहे. या खालोखाल नवी मुंबईत एक हजार ८०९ ऑक्सिजनवर तर १९४ व्हँटिलेटरवर आहे. यानंतर ठाणे मनपा क्षेत्रातील एक हजार ४९९ रुग्ण आँक्शिजन व १७९ व्हँटिलेटरवर आजमितीस उपचार घेत आहे. यापैकी चार रुग्णांचा येथील वेदांत रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.   

मीरा भाईंदर महापालिका परिसरात ९९० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर व्हँटिलेटरवर ९४ बाधीत उपचार घेत आहे. या तुलनेत भिवंडी परिसरात २३५ ऑक्सिजनवर असून २१ व्हँटिलेटरवर आहेत. उल्हासनगरमध्ये १९७ जण ऑक्सिजन घेऊन उपचारास प्रतिसाद देत आहेत. अंबरनाथला ५२७ व बदलापूरला ५४० जण ऑक्सिजनवर आहे. तर या शहरांमध्ये अनुक्रमे १५ व १६ जण व्हँटिलेटरवर आहेत. 

Web Title: Coronavirus Thane Updates: 8665 corona patients on ventilator; More than 2,000 patients in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.