शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

CoronaVirus in Thane : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ वर; १५ जणांवर कस्तुरबात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:05 AM

CoronaVirus in Thane : शुक्रवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी केली. आतापर्यंत १८०० जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४४ जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. तर १३ संशयितांचा यात समावेश आहे.

ठाणे : कोरोनाचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून आता त्यांची संख्या ही चार झाली आहे. तर गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या घरामधील तिघांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविले आहे. त्यामुळे ठाण्यात दिवसाला एक रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. तर शुक्रवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी केली. आतापर्यंत १८०० जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४४ जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. तर १३ संशयितांचा यात समावेश आहे.पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर गुरुवारी त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली. तो मुंबईतील खासगी रुग्णालयात कामाला होता. त्याला त्याच रुग्णालयात २० मार्च रोजी उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु, आता त्याच्या घरातील तिघांना ठाण्यातून कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट तूर्तास प्राप्त झालेले नसल्याची माहिती पालिकेने दिली.आता पर्यंत पालिकेने २७ मार्च पर्यंत १८०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९२७ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ८७३ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत १७५३ जणांना घरीच देखरेखाली ठेवले आहे.एका पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार४४ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करून घरी सोडले आहे. तर उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता. तर अन्य ९ जण हे संशयित आहेत. आता अन्य एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस