शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus in Thane : लॉकडाऊनचा कोळी बांधवांना फटका, मासेमारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 11:47 AM

CoronaVirus in Thane : मासे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने वेगवेगळ्या समुद्रकिनारी हजारो बोटी गेल्या काही दिवसांपासून उभ्या आहेत.

- विशाल हळदे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भाईंदर शहराला लागून असणा-या उत्तन, चौक, मोर्वे, वसई, गोराई आणि आजूबाजूला लागून असलेल्या गावांतील कोळी बांधवांना कोरोनामुळे चांगलाच फटका बसला आहे. मासे विक्रीवर मोठा परिणाम झाल्याने वेगवेगळ्या समुद्रकिनारी हजारो बोटी गेल्या काही दिवसांपासून उभ्या आहेत.

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा बंद केला नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात येणाºया अनंत अडचणी मच्छीमारांनी सांगितल्या. लोकमतशी बोलताना रितेश मुंबईकर (व्यवसाय मासे मारी)  म्हणाले की, 25 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आली, त्यावेळी आम्ही मासेमारीसाठी समुद्रात होतो. लॉकडाऊनची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्ही नेहमीप्रमाणे मासे घेऊन काठावर आल्यानंतर 21 दिवसांच्या लॉकडाऊनची माहिती मिळाली.

आधी कल्पना नसल्याने, इतक्या मेहनतीने पकडून आणलेली मासळी बरेच दीवस बोटीतच ठेवली. परंतु आता बोटीत असलेल्या कोल्ड रूममधील बर्फ संपला आहे. त्यामुळे मासळी खराब होऊ लागली आहे. त्यामुळे मासळी फेकून द्यावी लागत आहे. एका फाफेरीला, म्हणजेच आम्ही कवीला (मासे पकडायला ) समुद्रात जातो तेव्हा आम्हाला डिझेलसाठी जवळजवळ 70 हजार रुपये लागतात. बर्फासाठी 10 हजार रुपये आणि जेवणासाठी 10 ते 15 हजार रुपये जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये जातात. आता आमचे नुकसान कोण भरुन देईल, आम्ही कोणाला जाब विचारायचा असा सवाल एडविन मांतो ( मच्छीमार ) यानी  केला.

एकीकडे सरकार सांगते की जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आम्ही थांबवलेला नाही. दुसरीकडे आम्ही मासे विकायला निघालो की आम्हाला पोलीस सोडत नाहीत. मासे नेण्यासाठी गाडी मिळत नाही, बर्फ बनवला जात नाही, अशा एक ना दोन अनेक अडचणी मच्छीमारांनी मांडल्या. मासेविक्रीत येणा-या अडचणी पाहता मच्छीमारांनी मासेमारी जवळपास बंद केली असून, त्यामुळे हजारो बोटी किनाºयावर उभ्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे