शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मजूर गावाला गेल्याने धान्य गोदामातच, रेशनिंग दुकानांवर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 02:16 IST

- अनिकेत घमंडी डोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी ...

- अनिकेत घमंडीडोंबिवली : मे महिन्यातील तांदूळ आणि गहू घेण्यासाठी पूर्वेतील १०८ आणि पश्चिमेतील ५६ शिधावाटप दुकानांवर केशरी कार्डधारक गर्दी करत आहेत. मात्र, धान्य मिळत नसल्याने काही ठिकाणी लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. ठिकठिकाणच्या गोदामांमध्ये धान्यसाठा मुबलक आला असला तरी तो शिधावाटप दुकानांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजूरच नसल्याने सगळा घोळ निर्माण झाला आहे.पूर्वेत ४१ हजार ३०० आरसी तर, ३६ हजार ६०० केशरी कार्डधारक आहेत. त्या तुलनेत पश्चिमेत कमी लाभार्थी आहेत. पूर्वेकडील शिधावाटप अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकडाउनच्या काळात लाभार्थ्यांपर्यंत धान्य देण्यासाठी सरकारच्या नियोजनानुसार ७३ ट्रक धान्य एप्रिलमध्ये आले. मे महिन्याचेही धान्य भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये आहे. मात्र, मजूर मिळत नसल्याने धान्य वितरणाचा वेग पूर्व आणि पश्चिमेत मंदावला आहे. आतापर्यंत या महिन्याच्या सुरुवातीलाच जे धान्य यायला हवे होते, ते पूर्णपणे आलेले नाही. १३ मेपर्यंत ७३ पैकी २० ट्रक धान्य यायचे बाकी होते. केशरी कार्डधारकांना जे धान्य मिळणार होते त्यासाठीही ४२ ट्रक धान्य येणार होते, परंतु, ३१ ट्रक आतापर्यंत आले आहेत. चार दिवसांमध्ये ते धान्य येईल असे सांगितले जात असले तरी लाभार्थ्यांची समजूत घालताना दुकानचालकांच्या नाकीनऊ येत आहेत. परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल व सगळ्यांना धान्य मिळेल, याबाबतचे आदेशही संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले.उडवाउडवीची उत्तरेतुकारामनगर भागातील लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मंजूर असलेले धान्यही मिळत नसल्याने त्यांनी दुकानदाराकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल नगरसेवक नितीन पाटील यांनी केला आहे. त्यासंदर्भात शिधावाटप अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे ते म्हणाले. तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारवही मागितली असता दुकानदार टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली