शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

coronavirus: कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे भाईंदरमधील स्टील उद्योग चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 21:51 IST

coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रासह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत .

मीरारोड - भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशभरात प्रसिद्ध आहे .  वर्षी कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा हळूहळू रुळावर येऊ पहात होता . परंतु महाराष्ट्रा सह देशात कोरोनाने पुन्हा कहर माजवल्याने स्टील उद्योगावर अवलंबून असलेले व्यावसायिक व कामगार पुन्हा चिंतेत सापडले आहेत . 

भाईंदर मधील स्टील उद्योग हा देशातील सर्वात मोठा स्टील उद्योग म्हणून ओळखला जात होता . परंतु मुंबईला लागून असल्याने वाढत्या शहरीकरणासह स्टील उद्योगाच्या वसाहतीं कडे पालिका व राजकारण्यांसह लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले . जेणे करून अनेक उद्योजक हे वसई व त्या पुढे थेट गुजरात पर्यंत स्थलांतरित झाले . 

भाईंदर मध्ये स्टीलची  पासून त्याचे बफिंग पोलीस करणे व त्याची घाऊक विक्री करणारे असे  सुमारे ३ हजार व्यावसायिक आहेत . ह्या स्टील व्यवसायात काम करणारे सुमारे २५ हजार कामगार आहेत . येथून देशभरात जाणाऱ्या स्टील भांड्यांच्या विक्री व्यवसायावर सुद्धा हजारो व्यापारी व कामगार अवलंबून आहेत . 

गेल्यावर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात स्टील उद्योग सुद्धा अडचणीत सापडला . लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांनी त्यांच्या कडील कामगारांना आपापल्या परीने  त्यांना शक्य तेवढा पगार दिला . त्यांना गावी जाण्यासाठी पैसे दिले . सप्टेंबर पासून पुन्हा व्यवसाय सुरु  झाल्या नंतर कामगारांना परत आणण्यासाठी सुद्धा पैसे दिले . 

कोरोना संसर्गाने स्टील व्यवसाय सुद्धा आर्थिक संकटात आणला . परंतु स्टील व्यापाऱ्यांनी आला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले . हळूहळू तो रुळावर येत होता . लॉकडाऊन काळातले नुकसान भरून निघाले नसले तरी व्यवसाय पुन्हा सावरू लागला होता . 

 भाड्याने होते किंवा ज्यांच्या डोक्यावर कर्ज होते ते जास्त अडचणीत आले . दिलेल्या मालाची उधारी वसूल करणे सुद्धा अवघड झाले . ज्यांचे  होते त्यांना काहीसा दिलासा होता . पण व्यवसाय पूर्वपदावर येईल असे वाटत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने व्यावसायिक चिंतीत आहेत . त्यांच्या  पेक्षा जास्त चिंता रोजगार जाण्याच्या भीतीने कामगारांना सतावत आहे . 

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा निर्बंध आले आहेत . स्टील भांडी घेणारे देशभरातील व्यापारी सुद्धा लॉकडाउनच्या भीतीने माल उचलायला तयार नाहीत . तर माल दिल्यास त्याचे पैसे अडकले तर काय करायचे ? अशी चिंता उत्पादकांसह संबंधितांना लागली आहे . महाराष्ट्र शासनाने सरसकट लॉकडाऊन न करता सोमवार ते शुक्रवार व्यवसाय सुरु ठेऊन शनिवार आणि रविवार लॉकडाउनचा निर्णय घेतला तो स्वागताहार्य असल्याचे स्टील संघटनेचे राजेंद्र मित्तल म्हणाले . 

ReplyReply allForward

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायMira Bhayanderमीरा-भाईंदर