शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 13:15 IST

प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

ठाणे :  शुक्रवारी मुंब्र्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्रा-कळवा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड कमालीचे संतप्त झाले आहेत. मुंब्र्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याने ही धोक्याची घंटा असून 'अभी उपरवाला भी आपको बचा नाही सकेगा' असे खडेबोलच जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्याच्या नागरिकांना सुनावले आहे. गेले अनेक दिवस मी घराच्या बाहेर पडू नका असे वारंवार सांगत आहे, मात्र याचे कोणालाच गांभीर्य नसून अशाच प्रकारे जर मस्ती सुरु राहिली तर या शहराला कोणीही वाचवू शकणार नाही असे त्यांनी खडसावून सांगितले आहे.  ठाणे आणि कळवा परिसरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी,मुंब्र्यात परवापर्यंत एकही कोरोना रुग्ण अढळला नव्हता. मात्र शुक्रवारी मुंब्य्रातील अमृतनगर परिसरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून या कोरोनाचे काही दिल्ली कनेक्शन आहे का ? या दृष्टीने देखील तपास सुरु करण्यात आला आहे . मात्र प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच मुंब्र्याच्या नागरिकांची एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये चांगलीच कानउघडणी केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो कि घराच्या बाहेर पडू नका,मात्र कोणीही ऐकले नाही. मी या गोष्टी बोलणार नव्हतो मात्र आज या गोष्टी बोलायची वेळ आली असे सांगत तुम्हालाच तुमच्या जीवाचे परवा नसेल तर इतर कोणाला काय पडली आहे असे त्यांनी सांगितले. या शहराची मला चिंता आहे , कळवा आणि मुंब्र्यातील नागरिकांची मला काळजी आहे मात्र तुम्हालाच तुमची काळजी नसेल तर उपरवाला भी तुम्हे माफ नाही करेगा या शब्दात आव्हाड यांनी मुंब्र्याच्या जनतेला सुनावले असून आता मुंब्र्याची जनता हे किती गांभीर्याने घेणार आहे हे येणार यावर साशंकता आहे .

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस