शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाण्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याने केली कोरोनावर मात; बाळाची आईदेखील ‘निगेटिव्ह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 23:56 IST

२० दिवसांनी परतला घरी

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या सहा महिन्यांच्या ‘आर्यन’ या चिमुरड्याने चक्क कोरोनाला हरवले आहे. तब्बल २० दिवसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर तो शनिवारी घरी परतला आहे. त्याच्यासोबत शनिवारी एकूण ९ जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

कोरोनावर मात करून शनिवारी जिल्हा रूग्णालयातून घरी परतलेल्या ९ जणांपैकी ठामपा हद्दीतील ५ आणि केडीएमसी व वसई- विरार येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये ठाण्यात राहणाºया सहा महिन्यांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्याला जिल्हा रुग्णालयात १३ एप्रिल रोजी दाखल केले होते.

तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. इतक्या लहान मुलावर उपचार करणे डॉक्टरांसाठी एक आव्हान होते. तद्पूर्वी, एक चार वर्षांचा मुलगा कोरोनावर मात करून घरी परतला होता. त्या चार वर्षांच्या बालकाचा अनुभव असल्याने डॉक्टरांनी या सही महिन्याच्या बालकावरही उपचार सुरू झाले. या चिमुरड्याच्या आईची टेस्ट निगेटिव्ह होती. त्यामुळे तिला त्याच्यासोबत ठेवण्यात आले. अखेर त्या चिमुरड्याने कोरोनाला हरवले. दरम्यान त्याची आईची पुन्हा तपासणी केल्यावर ती निगेटिव्ह असल्याची खात्री करून घेतल्यावर त्या दोघांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.जिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत १२१ जणांना डिस्चार्जगेल्या एक महिन्यापासून कोविड १९ च्या रुग्णांवर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. तेव्हापासून आतापर्यंत ठाणे जिल्ह्यासह पालघर येथील एकूण २३७ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल झाले होते. त्यामध्ये १२१ जणांनी कोरोनाला हरवून ठणठणीत बरे होऊन ते घरी गेले आहेत. सद्य:स्थितीत रुग्णालयात ९५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. तर याचदरम्यान सहा जणांची प्राणज्योत मालवली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या