शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ, दिवसभरात सापडले 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:05 IST

गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 773 बाधितांची तर, 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 13 हजार 715 तर, मृतांचा आकडा 468 झाला आहे.

ठाणेठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. बुधवारी ठाणे जिल्ह्यातील आता पर्यंतची उच्चांकी नोंद झाली होती. त्यात दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने साडेसातशेचा टप्पा पार केल्यामुळे बाधितांच्या आकडेवारीचा नवा विक्रम झाला आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात 773 बाधितांची तर, 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा 13 हजार 715 तर, मृतांचा आकडा 468 झाला आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट गडद होत आहे.  ठाणे महानगर पालिका हद्दीत 170 बाधितांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा 4 हजार 655 तर,मृतांचा आकडा 145 वर पोहोचला आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक 195 रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 3 हजार 414 तर, मृतांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. तर, कल्याण –डोंबिवलीमध्ये 87 रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 726 तर, मृतांचा आकडा 55 इतका झाला आहे.तसेच मीरा भाईंदर मध्ये 145 रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 1 हजार 338 तर, मृतांचा आकडा 73 इतका झाला आहे. भिवंडी महापालिका हद्दीत 43 रुग्णांची करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 395 इतका झाला आहे. उल्हासनगर 15 रुग्णांची तर, एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे बाधितांचा आकडा 690 तर, मृतांचा आकडा 25 झाला आहे. अंबरनाथमध्ये 86 रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 541 तर, मृतांचा आकडा 18 इतका झाला आहे. बदलापूरमध्ये 26 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 380 झाला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 10 रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 575 वर गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे