शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: धक्कादायक! एकाच रुग्णालयातील ३ डॉक्टर आणि ८ परिचारिकांना कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 19:28 IST

रुग्णालयातील ३ डॉक्टर, ८ नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी पत्रकार यांच्याकडे केला. तसेच त्यांच्या कुटुंब व नातेवाईकाला झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

- सदानंद नाईक

 उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयातील ३ डॉक्टर्स व ८ नर्स सह त्यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला. याप्रकाराने खळबळ उडाली असून रुग्णालयातील रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.  उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणाहून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. अनेकदा कोरोनचे लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवले जाते. स्वाब अहवाल नंतर रुग्ण पोझिटीव्ह येत असून इतर रुग्णांना कोरोणचा संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टर व नर्स यांनी व्यक्त केली. आजपर्यंत रुग्णालयातील ३ डॉक्टर, ८ नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी पत्रकार यांच्याकडे केला. तसेच त्यांच्या कुटुंब व नातेवाईकाला झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाला नॉन कोविड दर्जा असताना संशयित कोरोना रुग्ण उपचार साठी येतात का? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच कोरोना रुग्णाच्या मृतदेह बांधून नातेवाईकांच्या ताब्यात मध्यवर्ती रुग्णालयातून दिला जातो. असेही डॉक्टर म्हणाले आहे. 

महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास मोहणलकर यांनी मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कबुली दिली. तर रुग्णालयाचे जिल्हा शल्चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी २ डॉक्टर व ५ नर्सला कोरोना संसर्ग झाला होतो. मात्र ३ दिवसा पासून सुट्टीवर असल्याने या कोरोना संसर्ग झाल्याचा निश्चित आकडा सांगता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. मध्यवर्ती रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी यांच्या सोबत याबाबत संपर्क साधला असता त्यांच्या सोबत संपर्क होऊ शकला नाही. डॉक्टर व नर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. तसेच रुग्णालयातील रुग्णात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉक्टर व नर्सचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडेमध्यवर्ती रुग्णालयातील अपुरा डॉक्टर, नर्स व कर्मचारी वर्ग, नॉन कोविड रुग्णालयाचा दर्जा असताना संशयित कोरोना रुग्णावर होत असलेल्या उपचाराने इतर रुग्णांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली. रुग्णालयाच्या डॉक्टर व नर्स यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून सुविधा व इतर समस्या बाबत साकडे घातले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगरthaneठाणे