शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

coronavirus: कोरोना पाॅझिटिव्ह बाळंतिणीची शिवसेनेने घेतली कुटुंबाप्रमाणे काळजी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 19:38 IST

बाळाची व पाॅझिटिव्ह आईची ताटातूट होऊ नये, म्हणून त्यांनी या दोघांची मर्फी आरटीओजवळील हाॅटेलमध्ये विशेष व्यवस्था केली.

ठाणे - कोरोनाच्या दुर्धर वातावरणात तिने गोंडस कन्येला जन्म दिला. माञ मातृत्व पदरी पडताच पाॅझिटिव्ह आलेल्या मातेची बाळापासून ताटातूट होऊ नये, म्हणून हाॅटेलात विशेष व्यवस्था शिवसेनेने केली. अंगडी, दुपटी, फळे, औषधे, मेथी - डिंकाचे लाडू असा सकस खुराक सुरु करताना पाॅझिटिव्ह बाळतिंणीची शिवसेनेने घरातील माहेरवाशीणीसारखी काळजी घेतली. एकीकडे  रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली असताना शिवसेनेने मायेची पाखर दिल्याने या मातेच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले.ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालया शेजारी असलेल्या धर्मवीर नगरात सदर महिलेचे पती गेली दहा वर्षे राहतात. हातावर पोट असलेल्या  त्यांची  पत्नी २ जूनला कळव्याच्या छञपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसूत झाली. तिने मुलीला जन्म दिला. माञ ५ जून रोजी पारदळे यांच्या पत्नी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. अवघ्या तीन दिवसांच्या बाळाची काळजी कोण घेणार, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर कुटुबांसमोर उभा ठाकलेला असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले - जाधव यांची टीम या कुटुबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

बाळाची व पाॅझिटिव्ह आईची ताटातूट होऊ नये, म्हणून त्यांनी या दोघांची मर्फी आरटीओजवळील हाॅटेलमध्ये विशेष व्यवस्था केली. यासोबतच या मुलीची काळजी घेण्यासाठी तिच्या वडिलांना हाॅटेलमध्येच ठेवले. केवळ हीच व्यवस्था करुन शिवसैनिक थांबले नाहीत. तर हाॅटेलमध्ये ठेवलेल्या या कुटुबियांची प्रत्येक अपडेट रुपाली रेपाळे व नम्रता भोसले-जाधव घेत होत्या. बाळाला पाळणा, छोटी गादी, अंगडी, दुपटी, नवजात शिशू सेट, औषधे पुरवली. तसेच पाॅझिटिव्ह बाळंतिणीला मेथी - डिंकाचे लाडू, मास्क, सॅनिटायझर, फळे, सकस जेवण  रेपाळे यांच्याकडून पाठविण्यात आले.

मला माझ्या कुटुंबीयांपेक्षा जास्त प्रेम मिळालेअगदी सर्वसामान्य स्थितीत माझी प्रसुती झाली असती तरी मला व माझ्या बाळाला इतक्या सोयीसुविधा मिळणे, कठीण होते. अगदी तशी एखाद्या कुटुबांप्रमाणे शिवसेनेने काळजी घेत माझी जपणूक केल्याचे या पाॅझिटिव्ह मातेने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे