शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मेडिकल सर्टिफिकेटच्या नावाखाली मजुरांची लूट; २०० ते ३०० रुपयांची होतेय आकारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:24 IST

खेमचंदानी यांनी परप्रांतीय मजुरांना बोलते केले असता प्रत्येकी २०० ते ३०० रुपये सर्टिफिकेटसाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर : परप्रांतीय मजुरांची मेडिकल सर्टिफिकेट देण्याच्या नावाखाली २०० ते ३०० रुपयांनी लूट सुरू असल्याचा प्रकार एका समाजसेविकेने उघड केला. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मालवलकर यांनी याबाबत चौकशीचे संकेत देत, पालिका प्रभाग समितीकडून मोफत मेडिकल सर्टिफिकेट दिले जात असल्याची माहितीही दिली.

उल्हासनगर औद्योगिक शहर असून मार्केट, लहान मोठे कारखाने व बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांश मजुरांना आपापल्या गावी जायचे असून त्यासाठी त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज आहे. महापालिकेने त्यांच्यासाठी प्रभागनिहाय डॉक्टर ठेऊन मेडिकल सर्टिफिकेट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र सर्टिफिकेटसाठी रांगा लागत असून, खाजगी डॉक्टरच्या सर्टिफिकेटलाही मान्यता असल्याची माहिती पालिकेने आहे.खाजगी डॉक्टर सर्टिफिकेटसाठी २०० ते ३०० रुपये घेऊन परप्रांतीय मजुरांची लूट करीत असल्याचा आरोप समाजसेविका सरिता खेमचंदानी यांनी केला.सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलखेमचंदानी यांनी परप्रांतीय मजुरांना बोलते केले असता प्रत्येकी २०० ते ३०० रुपये सर्टिफिकेटसाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात टेबल टाकून बसलेल्या एका डॉक्टरने सर्टिफिकेटसाठी २०० रुपये परप्रांतीय मजुरांकडून घेत असल्याची कबुली दिली. तसा व्हिडीओ खेमचंदानी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी या प्रकाराबाबत कानांवर हात ठेवले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मालवलकर यांनी याबाबत चौकशीचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस