शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

Coronavirus: कळवा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 02:39 IST

योग्य सुविधा मिळत नसल्याचा केला आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णायातील एका ५५ वर्षीय वैद्यकीय महिला अधिकाºयालाच कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या इतर ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी तसेच तिच्या २ मुलींची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वीदेखील याच हॉस्पिटलमधील अन्य एका वैद्यकीय महिला कर्मचाºयालाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी लढा देणाºया अधिकारी तसेच नर्सना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचे या हॉस्पिटलमधील स्टाफचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात लोकमान्यनगरातील एका रुग्णाच्या संपर्कात येऊन एका महिला कर्मचाºयास कोरोना लागण झाल्यानंतर हॉस्पिटलमधील जवळपास ६० जणांना क्वॉरंटाइन केले होते. तर हॉस्पिटलमधील प्रसूती विभागदेखील बंद केला आहे. आता आणखी एका ५५ वर्षीय महिला वैद्यकीय अधिकाºयालादेखील त्याची लागण झाल्याने इतर वैद्यकीय अधिकाºयांमध्येदेखील भीतीचे वातावरण आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या हॉस्पिटलमध्ये युनिट हेड असून त्यांच्या संपर्कात त्यांच्या दोन मुली आणि इतर तीन ते चार वैद्यकीय अधिकारी आहेत. या सर्वांना चाचणी करून क्वारंटाइन करण्यात येणार आहे.पीपीई किट्स मिळत नाहीतयेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारचे पीपीईो किट्स उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे आरोप हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सकडून केला जात आहे.मागणी करूनही अद्याप महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे; परंतु हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाºयांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून अधिकारी आणि महिला कर्मचारी यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे.याशिवाय आयसोलेशन वॉर्डमध्ये जाताना पीपीई किट्स दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.रुग्णालयप्रमुखांना कारणे दाखवा नोटीसमृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवार्इंकाच्या स्वाधीन केला होता. परंतु, त्यानंतर तो मयत पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.सलग तिसºयांदा रुग्णालयाने अशी चुक केल्याने अखेर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रुग्णालयप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर ते काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येथील वागळे इस्टेटच्या इंदिरानगरातील हनुमाननगरमधील एका ५५ वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला या रुग्णालयात दाखल केले होते. परंतु,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची करोना चाचणी प्रशासनाने केली होती. मात्र, तिचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. परंतु, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.

या रुग्णाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शनास आणि अंत्ययात्रेत अनेकजण सामील झाल्याचे बोलले जात असून यामुळे डोंगर टेकडीवर वसलेल्या दाटीवाटीच्या भागात करोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र आहे. यापूर्वीही या रुग्णालयाकडून दोनदा अशी चुक घडली होती. आता तिसºयांदा ती झाल्याने महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबधींत रुग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती महापालिकेने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस