शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: वेतन वेळेवर द्या, कोविड योद्धे म्हणून लढाईला तयार; गृहरक्षक दलाच्या जवानांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 23:46 IST

५० वर्षांपुढील जवानांनीही दाखविली तयारी, बंदोबस्तामध्ये योगदान

जितेंद्र कालेकर

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या ५०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना बळ देण्यासाठी आम्ही कोविड योद्धे म्हणून लढण्यासाठी तयार आहोत. फक्त आमचे वेतन वेळेत मिळावे तसेच गेल्या काही महिन्यांपासून बाकी असलेले वेतनही किमान मिळावे. तसेच श्रीमलंग बंदोबस्ताचे सुमारे ६०० जवानांचे थकित वेतनही तातडीने द्यावे, अशी मागणी ठाण्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली आहे.

प्रत्येक मोठ्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने गृहरक्षक दलाचे महिला आणि पुरुष जवान हे योगदान देत असतात. यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव, बकरी ईद, निवडणूका किंवा आता कोरोनासारखा लढा असो या सर्वच बंदोबस्तासाठी गृहरक्षक दल अर्थात होमगार्डस्चे जवान कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मात्र ५० पेक्षा अधिक वयाच्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी नाकारली जात आहे. कंटेनमेंट झोन किंवा नाक्यावरील बंदोबस्तासाठी पोलिसांचे संख्याबळ हे अपुरे पडत आहे.

त्यामुळे या गृहरक्षक दलाच्या जवानांचे संख्याबळ आणि इच्छा असूनही त्यांना हे बंदोबस्त दिले जात नाही. त्यामुळे घरी बिनपगारी राहिल्यामुळे घर चालवायचे कसे? या प्रश्नामुळेही त्यांच्यात अस्वस्थता आहे. त्यामुळे ज्यांची प्रकृती चांगली असेल आणि इच्छा असेल त्यांना हे बंदोबस्त दिले जावेत. आम्ही कोविड योद्धे होण्यास तयार आहोत. फक्त वेळेवर मानधन दिले जावे, इतकीच अपेक्षा असल्याचे मत ठाण्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी व्यक्त केले आहे. मात्र, गृहरक्षक दलाच्या ठाण्यातील कार्यालयातून बंदोबस्ताची यादी काढणारे तसेच काही कार्यालयीन वरिष्ठ अधिकारी मात्र, अगदी गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचाऱ्यांशीही उद्धटपणे वर्तन करतात. यावरूनही या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीमलंग गडावर बंदोबस्त केलेल्या गृहरक्षक दलातील ६०० जवानांचे वेतनही थकविले आहे. तेही तातडीने देण्याची मागणी या जवानांनी केली आहे. याबाबत प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.केवळ हाजीमलंग बंदोबस्ताचे वेतन बाकी आहे. तेही लवकरच मार्गी लागेल. राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच कोरोनामुळे संपूर्ण राज्यभरात ५० नव्हे तर ४५ पेक्षा अधिक वयोगटातील कर्मचाºयांना बंदोबस्त दिला जात नाही. यात थेट आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे हा धोका पत्करला जात नाही. कालांतराने परिस्थितीनुसार नियमावलीत बदल झाल्यास त्याबाबतचा विचार होऊ शकतो. - संजय पाटील, जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस