शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात एकूण ५४३ रुग्ण; नव्याने ३७ रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 02:30 IST

नवी मुंबई महापालिका शंभरीच्या उंबरठ्यावर

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे व मीरा भाईंदर या महापालिका पाठोपाठ गुरु वारी कल्याण-डोंबिवली या महापालिकेतील पॉझिटिव्ह रु ग्णांनी ही शंभरीचा आकडा पार केला आहे. तर नवी मुंबई महापालिका ही शंभरीच्या उंबरठ्यावर उभी आहे.गुरु वारी ३७ नवे रु ग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५४३ वर पोहोचली आहे. यात उल्हासनगर येथेही बऱ्याच दिवसांनी रु ग्ण आढळला असून अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि मीरा भाईंदर येथे गुरुवारी नव्याने एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील ठामपा कार्यक्षेत्रात ११ नवे रु ग्ण आढळून आल्याने रु ग्णांची १७८ झाली आहे. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये ७ पुरु ष आणि ४ महिलांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये ७९ वर्षीय तर महिलांमध्ये ६६ वर्षीय इतके वय आहे. तर केडीएमसीमध्येही ११ नवीन रुग्ण आढळले आहेत. येथेही ८ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. ४ जण डोंबिवली तर ६ जण कल्याण व एक रुग्ण टिटवाळा येथील रहिवासी आहे. तसेच सर्वाधिक १३ रुग्ण हे नवी मुंबईत आढळून आले आहेत. भिवंडी आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला आहे. भिवंडीतील पॉझिटिव्ह रुग्ण हा मधुमेह या आजाराने त्रस्त असून त्यांचे वय हे ६५ वर्षांचे आहे. त्यांना यापूर्वी नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना भिवंडी येथील रु ग्णालयात दाखल केल्यावर ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.मीरा-भार्इंदरमध्ये एकही रुग्ण नाहीठामपात एकूण १७८ रु ग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असली तरी त्यापाठोपाठ गुरु वारी एकही रु ग्ण न सापडलेल्या मीरा भार्इंदर दुसºया क्र मांकावर आहे. तेथे एकूण ११४ रु ग्ण आहेत. केडीएमसीत रुग्ण संख्या १०६ झाली असून गुरु वारी जिल्ह्यात सर्वाधिक रु ग्ण आढळणाºया नवी मुंबईतील रुग्ण संख्या ९८ झाली आहे. बदलापूर आणि ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी १६, भिवंडी-७, अंबरनाथ-४ आणि उल्हासनगर २ असे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५४३ इतके रु ग्ण सापडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या