शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

CoronaVirus: वारली चित्रशैलीत कोविडचा वैश्विक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 00:30 IST

अनिल वांगड यांचे चित्र; ठळक घडामोडी चितारल्या, साठ टक्के रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीला देणार

- अनिरुद्ध पाटिलबोर्डी : कोविड-१९ ने जगातील बहुतांशी देशांना विळख्यात घेतले असून आतापर्यंत लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत. या विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे झालेले परिणाम तसेच भारताने अवलंबिलेले तंत्र, या दरम्यान घडलेल्या ठळक घडामोडींचे वर्णन डहाणूतील गंजाड येथील जागतिक दर्जाचे वारली चित्रकार अनिल चैत्या वांगड यांनी चितारले आहे. या चित्राची विक्री दीड लाख रुपयांना केली जाणार असून त्यापैकी साठ टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याची माहिती वांगड यांनी दिली.डहाणूतील गंजाड या गावाला पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या योगदानामुळे वारली चित्रशैलीचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचा हा समृद्ध वारसा त्यांचे शिष्य अनिल चैत्या वांगड हे चालवीत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन विविध देशात लावले जात असून तेथे त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. पारंपरिक विषयांसह आधुनिक घडामोडींना या चित्रशैलीत स्थान मिळाले आहे. कोविड-१९ हा विषय वांगड यांनी वारली चित्रातून दाखवला आहे. त्यांनी ५२ बाय ६२ इंच आकाराच्या कॅनव्हासवर २२ मार्च ते लॉकडाऊनचा दुसरा टप्पा या दरम्यान जागतिक स्तरावर या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घडलेल्या घटनांना मूर्त रूप दिले आहे.तंत्रज्ञानाच्या वापरापूर्वी आणि औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच देशातील आमूलाग्र बदल, त्यानंतर चिनी ड्रॅगन दाखवून वुहान येथे प्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव, इटली, स्पेन, फ्रान्स (आयफेल टॉवर) अशा विविध देशांचे लँडमार्क दाखवून तेथे विषाणूचा संसर्ग, जीवित व वित्तहानीचे वर्णन चित्रातून रेखाटले आहे.भारतात या विषाणूचा फैलाव दाखवताना जनता कर्फ्यू, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा उल्लेख आहे. या मोहिमेत कर्तव्य बजावणाºया आरोग्य कर्मचारी, पोलीस या विभागांच्या कार्याचा गौरव टाळ्या, घंटानादाने करण्याचे पंतप्रधानांनी देशवासीयांना केलेले आवाहन, त्याला जनतेचा मिळालेला प्रतिसाद, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, ठिकठिकाणी स्थानबद्ध झालेले नागरिक, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, भोजन वाटपाकरिता पुढे आलेले हात, पर्यटनासह अन्य व्यवसायावर झालेला परिणाम, संसर्ग झालेल्या रुग्णांचे ‘क्वारंटाईन’ तसेच दवाखान्यातील उपचार, त्यानंतर पूर्ण बरे झालेले रुग्ण या विविध घडणाºया घटनांची प्रसारमाध्यमातून माहिती घेऊन ती चित्रातून मांडण्यात आली आहे.महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन केल्याने अन्य देशांच्या तुलनेत भारताने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बºयाचप्रमाणावर यश मिळविले आहे. लॉकडाउन हाच या रोगावर एकमेव उपाय असून त्यामुळे रोगाचा अंत झाल्याचा आशावाद त्याचा विषाणूचा आकार लहान-लहान करून दाखवला आहे. आधुनिक जगाचे वर्णन असले, तरी हे चित्र पारंपरिक वारली चित्रशैलीत काढले आहे. हे चित्र पूर्ण झाले असून त्याची विक्री दीड लक्ष किमतीला केली जाईल, अशी माहिती दिली.कोरोना या महामारीचा चीन येथे झालेला प्रारंभ, विविध देशात झालेला परिणाम, भारतातील घडामोडी इ. वर्णन वारली चित्रशैलीत चितारले आहे. त्याची किंमत दीड लक्ष इतकी असून त्याची विक्री झाल्यास ६० टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे.’- अनिल चैत्या वांगड, वारली चित्रकार,डहाणू (गंजाड)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या