शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:01 IST

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३८१ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८८० तर मृतांची १५१ इतकी आहे. ठाणे पालिका हद्दीत २९६ बाधीतांसह १६ जणांचा मृत्यू झाला.यामुळे बाधितांची संख्या ११ हजार २९५ तर मृतांची ४३२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ११५ रुग्णांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १६१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्य झाल्याने े बाधितांची संख्या चार हजार ६३३ तर, मृतांची १७२ झाली आहे. भिवंडी पालिकेत ३० बाधीतांमुळे संख्या दोन हजार ४३७ झाली. उल्हासनगरात ११९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८८ तर मृतांची ५८ आहे. अंबरनाथमध्ये ५१ रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३०३ तर मृतांची संख्या ७८ झाली. बदलापूरमध्ये ६२ रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या एक हजार ७३ तर, मृतांची १८ झाली आहे.नवी मुंबईत ८ हजारांचा टप्पा पूर्णनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ११५ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या ८,0७२ झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये आठ हजार रूग्णांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील आठ पैकी पाच विभागात एक हजार पेक्षा जास्त रूग्ण झाले आहेत. सर्वाधिक १,४१६ रूग्ण कोपरखैरणे मध्ये आहेत. मृतांची संख्या २६0 झाली आहे. मंगळवारी १५९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,७४५ रूग्ण बरे झाले आहे.वसई-विरारमध्ये १४६ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात १४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९९ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी तब्बल ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७०० झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० झाली आहे, तर २,७६९ रुग्ण उपचार घेत आहेत.रायगडमध्ये २३५ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी २३५ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५,८३४ वर पोहोचली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.तर २५२ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी ३३०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २३५९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे