शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २००६, शनिवारी तिघांचा मृत्यू, नव्या १८४ रुग्णांची पडली भर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 06:26 IST

मागील चोवीस तासात नवी मुंबईत सर्वाधिक ६५ नवे रुग्ण आढळून आले असून भिवंडीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २००६ झाली असून शनिवारी नव्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तिघांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ४९ झाली आहे. मागील चोवीस तासात नवी मुंबईत सर्वाधिक ६५ नवे रुग्ण आढळून आले असून भिवंडीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ३०० पेक्षा जास्त झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.शनिवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या ५९२ झाली आहे. तसेच नवी मुंबईत आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांची संख्या १२ झाली. ठाणे महापालिका हद्दीत नव्या ६० रुग्णांमुळे तेथील एकूण रुग्णसंख्या ६७१ झाली आहे. कल्याण- डोंबिवलीतही २५ नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३०५ झाली आहे. यामध्ये १४ रुग्ण डोंबिवलीत आणि १० रुग्ण कल्याण येथील आहेत. त्यातच एकाचा मृत्यू झाल्याने केडीएमसी क्षेत्रातील मृतांची संख्या चार झाली आहे. मीराभार्इंदर येथे नव्या सात रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या २४२ झाली आहे.उल्हासनगर येथे नवे १६ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ३४ झाली आहे. ठाणे ग्रामीण आणि बदलापूर येथे प्रत्येकी पाच नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ७७ आणि ५१ इतकी झाली आहे. एक नवीन रुग्ण अंबरनाथ येथे नोंदवल्याने तेथील रुग्ण संख्या १३ झाली आहे.भिवंडीत एकही नवीन रुग्ण न सापडल्याने तेथील रुग्णसंख्या २१ वर स्थिर राहिला. येथील परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.आव्हाड यांची प्रकृती स्थिर, आणखी एका आमदाराला लागणराज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून ठाण्यातील शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी या आमदाराच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या आमदाराला क्वारंटाइन केले होते. खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या आव्हाड यांची प्रकृती स्थिर आहे. माझी तब्येत आता खूप चांगली असून लवकरच मला घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे